श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथे धर्मांध गोतस्कराला अटक !

धर्मांध गोतस्कराला अटक

श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – गोवंशियांची हत्या करणे, मांसवाहतूक करणे, विक्री करणे या प्रकरणी ममदापूर येथील फैजान जब्बार कुरेशी याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. फैजान याला लोणी परिसर आणि अहिल्यानगर जिल्हा तडीपार (जिल्हाबंदी) केले होते. असे असतांनाही तो स्वत:चे अस्तित्व लपवून श्रीरामपूर शहरातील मौलाना आझाद चौक येथे रहात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून हॉटेल मिरावली येथून त्याला अटक केली.

संपादकीय भूमिका

  • धर्मांधांना कायद्याचा धाक नसल्यानेच गोवंशियांच्या हत्या थांबत नाहीत !
  • या घटनेतून गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता लक्षात येते !