
संत
‘देणे’, हा संतांचा स्वभावच असतो. संत तेच, जे सतत देत असतात, सतत देणारा महान् महात्मा. जसे द्याल, तसे अंतःकरण क्षुद्रतेतून मुक्त होत जाईल. विराट बनेल. जसे मन विराट होईल, तसे देत जाल. जे जवळ असेल, ते अखंड देत जा. देणार्याच्या अंतःकरणात परमात्मा तरळतो. त्याच्या हृदय सिंहासनावर विराजमान होतो; कारण त्याचे अंतःकरण विशाल बनलेले असते. तिथे गोळा केलेली घाण, कचरा नसतो. सगळा संसार जो बाहेरच ठेवतो, तो नकारात्मकता, दुःख, अशांती, माया यांना आत शिरूच देत नाही. त्याच्या अंतःकरणातच निर्मळ, स्वच्छ, पवित्र जागा असते. तिथे परमात्मा येऊन हृदयाच्या सिंहासनावर विराजमान होऊ शकतो.
असंत
असंत सतत ‘गोळा’ करत असतात. सतत गोळा करणारा क्षुद्र. जे अंतःकरण घाण आणि कचर्याने भरगच्च आहेअन् त्यात सतत भर पडतेच आहे, तिथे परमात्मा प्रवेश कसा करू शकेल ? प्रवेश करायला जागा कुठे आहे ? सगळी घाण आणि कचरा.
महात्मन
परमात्मा महात्मन आहे. जो महात्मा होईल, तोच परमात्म्याला प्रिय होईल. महात्म्याचे अंतःकरण त्याला अधिक आवडते. आकाशही ठेंगणे होईल, असे महिमावान महात्मन व्हा !’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, डिसेंबर २०२२)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !