
ठाणे, १ मार्च (वार्ता.) – बदलापूर येथील एका तरुणीने चारचाकी चालवतांना प्रभु श्रीरामांविषयी एक आक्षेपार्ह चित्रीकरण सिद्ध करून ते सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले आहे. या चित्रीकरणामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून बजरंग दल, वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी बदलापूर (पूर्व) पोलीस ठाण्याच्या परिसरात एकत्र येऊन ही तरुणी अन् तिचा मित्र यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून ते पुढील अन्वेषण करत आहेत.
या घटनेचा निषेध करत येथील रिक्शाचालकांनी रिक्शा बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे बर्याच नागरिकांना पायपीट करत इच्छित स्थळी पोचावे लागले. (हिंदु धर्मियांवर होणारे आघात रोखण्यासाठी एकत्र येऊन प्रत्यक्ष कृती करणारे जागृत हिंदूच हिंदु धर्माची खरी शक्ती आहेत ! – संपादक)
१. २८ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८ वाजता व्हॉट्सॲपवर संबंधित चित्रीकरण आढळल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. तक्रारीनुसार मृणाल महेश जाधव या तरुणीने प्रभु श्रीरामांविषयी अपमानकारक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे नमूद करण्यात आले असून त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
२. या संदर्भात ‘विश्व वारकरी संघ, महाराष्ट्र’चे अंबरनाथ तालुका अध्यक्ष ह.भ.प. मोहन महाराज शिंदे आणि तालुका उपाध्यक्ष ह.भ.प. मच्छिंद्र महाराज भोईर यांनी, तसेच आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या जिल्हा अध्यक्ष ज्योती जवळेकर आणि कोकण प्रांत मंत्री सचिन धुळे अन् कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन संबंधित तरुणीवर गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली होती.
प्रतिभा जाधव यांचे भाजप महिला शहराध्यक्षपदाचे त्यागपत्र !
प्रभु श्रीरामांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारी मृणाल महेश जाधव ही भाजपच्या महिला शहराध्यक्षा प्रतिभा महेश जाधव यांची मुलगी आहे. या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक झाल्याने बदलापूर पोलिसांनी संबंधित तरुणीला कह्यात घेतले. या घटनेचे नैतिक दायित्व स्वीकारत प्रतिभा महेश जाधव यांनी भाजपच्या महिला शहराध्यक्षपदाचा त्यागपत्र दिले आहे. भाजप नेते महेश जाधव आणि प्रतिभा जाधव यांनी माध्यमांसमोर क्षमा मागत ‘आम्ही हिंदु परंपरा पाळणारे कुटुंब आहोत’, असे सांगितले आहे.
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
नैऋत्य मौसमी पावसाचे (मान्सूनचे) केरळमध्ये आगमन