हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या निवेदनाचा परिणाम

रत्नागिरी – जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतींवर काही दिवसांपूर्वी मुसलमान संस्थांकडून अनधिकृतपणे धार्मिक फलक लावले होते. याविषयी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने रुग्णालय प्रशासनाला निवेदन सादर केले होते. त्याची नोंद घेत रुग्णालय प्रशासनाने हे फलक तात्काळ काढून टाकले आहेत. फलक काढल्याचे लेखी पत्रही रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे.

१. जिल्हा शासकीय रुग्णालय (रत्नागिरी )च्या परिसरात आणि इमारतींच्या भिंतींवर ‘इफ्तारी का इंतिजाम’, ‘सेहरी का इंतजाम किया जाएगा’, अशा आशयाचे फलक ‘यंग मेमन वेल्फेअर फाउंडेशन’ आणि ‘अरमान ग्रुप, रत्नागिरी’ या मुसलमान संस्थांनी संपर्क क्रमांकांसहित काही दिवसांपूर्वी लावले होते.
२. शासकीय नियमांनुसार आणि भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात किंवा रुग्णालय परिसरात एखाद्या विशिष्ट धर्माचा प्रचार करणारे किंवा धार्मिक उपक्रमाचे फलक लावण्यास मनाई आहे, हे सूत्र हिंदु राष्ट्र समन्वय समितीने जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली होती.
३. ‘हे फलक तात्काळ काढून टाकावेत आणि ते लावणार्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी’, अशी मागणीही समितीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.


४. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी तात्काळ हे फलक काढून टाकण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनास दिले आणि ते फलक काढून टाकण्यात आले. शासकीय जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना ‘पुन्हा असे फलक लावायला देऊ नयेत आणि हे पुनश्च घडू नये’, याची दक्षता घ्यावी’ळ असे कडक निर्देश देण्यात आले आहेत, असे लेखी पत्र रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल श्री. संतोष सावंत यांनी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. प्रभाकर खानविलकर यांना दिले आहे.
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी