|
(लिव्ह इन रिलेशनशिप, म्हणजे विवाह न करता पुरुष आणि स्त्री यांनी एकत्र रहाणे)
(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)

चेन्नई (तमिळनाडू) – कृष्णागिरी जिल्ह्यात अडीच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या युवक शाखेशी संबंधित एम्. पेरियानायकम या स्थानिक पदाधिकार्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध ‘पॉक्सो’ कायदा आणि हत्येसंदर्भातील गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून विरोधी पक्षांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारवर टीका केली आहे.
पेरियानायकम ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहात होता. जोडीदार महिलेला एक मुलगीही होती. काही दिवसांपूर्वी मुलीची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी तिला मृत घोषित केले. मुलीच्या जैविक वडिलांना संशय आल्याने त्यांनी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी अन्वेषण चालू करून शवविच्छेदन केले असता मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधाला भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे ! |
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात