
पठाणकोट (पंजाब) – ‘ऑपरेशन सिंदूर’ चालूच आहे. आपण पाकिस्तानला ऑपरेशनचा एक अत्यंत लहानसा नमुना दाखवला होता. अवघ्या ४ दिवसांतच त्यांना गुडघे टेकायला लावले होते. ‘ऑपरेशन सिंदूर २’ साठीची सिद्धता बर्यापैकी व्यापक प्रमाणावर आहे. हे ऑपरेशन कशा प्रकारे पार पडेल ?, यावविषयी मी तुम्हाला आता सांगू शकत नाही; कारण ते आपल्याला शत्रूची किती हानी करायची आहे ?, यावर अवलंबून असेल. मग ते भूमीवरचे असेल, समुद्रातील किंवा आकाशातील असेल, आपण ते घडवून आणण्यासाठी सदैव सिद्ध आहोत, अशी माहिती सैन्याच्या वेस्टर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी येथे दिली.
आम्ही पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे सिद्ध ! – लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार
‘वेस्टर्न कमांड’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी सांगितले की, सैन्य भविष्यातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सिद्ध असून अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरणार नाही. भविष्यातील कोणत्याही संघर्षाचा निकाल भूमीवर निर्णायक असेल. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकिस्तानने एका बाजूला अण्वस्त्रांच्या धमक्या दिल्या आणि दुसरीकडे युद्धविरामासाठी केविलवाणी धडपड केली. पाकिस्तानने म्हटले होते की, जर आमचा विनाश झाला, तर आम्ही अर्ध्या जगाला बरोबर घेऊन जाऊ. ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या वेळी आम्ही त्यांच्या अण्वस्त्रांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष केले.
या वेळी आम्ही पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे सिद्ध आहोत आणि आमच्याकडे भविष्यासाठी स्पष्ट योजना आहे. आमचे नेतृत्व देशाच्या आणि जनतेच्या भल्यासाठी वचनबद्ध आहे, तर त्यांचे नेतृत्व केवळ सत्तेत रहाण्यासाठी अन् स्वतःचे महत्त्व टिकवण्यासाठी स्वार्थाने प्रेरित आहेत. याच कारणासाठी ते भारतासमवेत युद्धासारखी परिस्थिती लांबवू इच्छितात. पाकिस्तानकडे भारताशी समोरासमोर लढण्याचे ना धैर्य आहे, ना शक्ती; म्हणूनच ते छुप्या युद्धाचा अवलंब करतात.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !