प्रत्येक क्षेत्रात स्वदेशीची भावना जागृत करणे आवश्यक !

स्वभाषा, वेशभूषा, अन्न, इतिहास, परंपरा, संस्कृती, चालीरीती, वाढदिवस, नवीन वर्ष, शुभेच्छापत्रे, स्वाक्षरी, घरांवरील नावफलक, दुकानांवरील नावफलक, विविध प्रसंगांसाठी निमंत्रणे, मुलामुलींची नावे, शिष्टाचार, हाक मारण्यासाठी संबोधन (आई, वडील, मावशी, आजी, मावशी, काका, आजोबा इत्यादी असावे; मम्मी, पप्पा, अंकल, आंटी नको) इत्यादी सूक्ष्म तपशीलांद्वारे प्रत्येक घरातून देशाभिमान आणि स्वाभिमान जागृत केले जावा. मुलांचे मन संस्कारक्षम असते. या गोष्टी त्यांच्या मनात रुजवल्या पाहिजेत, म्हणजेच ‘स्वदेशी भावना’ स्वभाव बनली पाहिजे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात स्वदेशी चळवळ चालू झाली. तेव्हा तिचे स्वरूप काही प्रमाणात प्रतिक्रियात्मक होते. आता आपल्याला पुन्हा त्या दिशेने वळावे लागेल.

(साभार : ‘हिंदू घर’, प्रकाशक – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ७.१०.२०००)