‘३०.११.२०२५ या दिवशी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) अनंत कृपेमुळे दैवी सत्संगात मी (कु. प्रार्थना पाठक, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १४ वर्षे) सांगितलेला ‘सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांशी भ्रमणभाषवर बोलणे’ हा भावजागृतीचा प्रयोग, तसेच कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १८ वर्षे) हिने भावजागृती प्रयोगाच्या संदर्भात सांगितलेली सूत्रे, तसेच साधकांनी केलेले आत्मनिवेदन गुरुचरणी समर्पित भावाने अर्पण करतो.

१. कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १४ वर्षे) हिने सत्संगात सांगितलेला ‘सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांशी भ्रमणभाषवर बोलणे’ हा भावजागृतीचा प्रयोग
‘आता आपण आपले डोळे मिटूया. आपण कुठे आहोत ? आता आपण आपल्या सेवेच्या ठिकाणी बसून सेवा करत आहोत. ‘आपली सेवा परिपूर्ण कशी होईल ?’, असा विचार करत आपण आपल्या सेवेत मग्न झालो आहोत. त्या वेळी अकस्मात् आपल्या भ्रमणभाषची ‘रिंगटोन’ वाजू लागली. आता आपण हा भ्रमणभाष उचलून लगेच कानाला लावला आहे आणि आपल्याला आवाज आला, ‘नमस्कार !’
तो मधुर आवाज ऐकताच आपल्या देहावर रोमांच आले. ‘कुणाचा बरे आवाज आहे हा ?’ ही वाणी प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची आहे ! आपल्या प्राणप्रिय गुरुमाऊलींनी आज आपल्याला भ्रमणभाष केला आहे. आपल्याला पुष्कळ आनंद झाला आहे. आता ‘मी त्यांना काय सांगू ? कसे आत्मनिवेदन करू ?’, हेच मला सुचेनासे झाले आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आपल्याला विचारत आहेत, ‘कसे आहात ? भावस्थितीत आहात ना ? सेवा चालू आहे ना ?’
आता आपण कृतज्ञताभावाने आपल्या मनातील सारे विचार गुरुदेवांना सांगत आहोत. आपण आत्मनिवेदन करत असलेली प्रत्येक गोष्ट प.पू. गुरुदेव अपार प्रीतीने ऐकत आहेत आणि त्याला मधुर प्रतिसादही देत आहेत. हळूहळू आपण या आत्मनिवेदनाशी एकरूप झालो आहोत. हा ‘भ्रमणभाष म्हणजे आपले अंतर्मनच आहे’, असे आपल्याला जाणवू लागले आहे. जरा या अंतर्मनाकडे पाहूया. आपल्या अंतरातील सारे स्वभावदोष, अहं आणि अनावश्यक विचार यांना पुसूया (डिलिट) आणि नंतर मनात केवळ आणि केवळ गुरुदेवांचे तत्त्व अनुभवूया !
गुरुदेव आपल्याला विचारत आहेत, ‘माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो आहे ना !’ त्यांची ती वाणी ऐकून आपली भावजागृती होऊ लागली आहे. आपल्या डोळ्यांतून येणार्या भावाश्रूंमुळे भ्रमणभाष चिंब भिजला आहे. आपण गुरुदेवांना शरणागतभावाने प्रार्थना करूया, ‘हे विष्णुस्वरूप गुरुमाऊली, तुम्हीच प्रीतीस्वरूप आहात. आम्हा पामर जिवांनाही सूक्ष्मातून तुमच्याशी भ्रमणभाषवर बोलण्याची संधी मिळाली. ‘अनावश्यक विचारांचे ‘ॲप’ या मनरूपी ‘भ्रमणभाष’मध्ये कधीच ‘डाऊनलोड’ होणार नाही’, असे चैतन्य तुम्हीच या मनात निर्माण करा. हे गुरुदेव, तुमच्या या भ्रमणभाषला ‘रेंज’ कधीच अल्प पडणार नाही; कारण प्रत्येक साधकाच्या हृदयात तुमच्या भक्तवत्सलतेचा मनोरा (टॉवर) तुम्हीच निर्माण केला आहे. हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, कधी कधी या मनोर्याभोवती आमच्या स्वभावदोष आणि अहं यांचे काळे डाग जमा होतात आणि तुमच्याशी असलेले अनुसंधान खंडित होते. आमच्यातील हे स्वभावदोष आणि अहं यांचे काळे ढग दूर करण्यासाठी तुम्हीच आमच्याकडून प्रयत्न करून घ्या !’
आपली ही प्रार्थना ऐकून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या स्मितहास्याचा आवाज आपल्या कानी पडत आहे. तो मधुर नाद आपण आपल्या कानांत साठवून ठेवूया !
गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करूया, ‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, ‘आज सूक्ष्मातून जो संवाद चालू झाला आहे, तो अखंड चालू राहू दे. आमचे अनुसंधान असेच अखंड राहू दे.’ ‘आज या भ्रमणभाषवरून झालेल्या संभाषणाद्वारे तुम्ही आम्हाला जी सूक्ष्मातून अनुभूती दिलीत’, त्याबद्दल आम्ही दैवी बालसत्संगातील सर्व साधक तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत !’
२. कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १८ वर्षे) हिने भावजागृती प्रयोगाच्या संदर्भात सांगितलेली सूत्रे

अ. ‘हे संभाषण म्हणजे गुरुदेवांशी असणारे अखंड अनुसंधान आहे. हे संभाषण आपल्याला हृदयात अखंड अनुभवता येणार आहे.
आ. हा भावजागृतीचा प्रयोग म्हणजे जणू ‘आत्मनिवेदन भक्ती’ आहे. या दिव्य ‘भक्त आणि भगवंत’ यांच्यामध्ये कुणीच येऊ शकत नाही. त्यामुळे आपण भगवंताशी अखंड बोलण्याचा प्रयत्न करूया.
इ. आपण भ्रमणभाषला वेळोवेळी भारित करतो. आपल्या या अंतर्मनाचा भ्रमणभाष भारित करणे, म्हणजे ‘व्यष्टी आढावा’ आहे. त्यामुळे दिवसभरातून अधिकाधिक वेळा आपण गुरुदेवांना हा आढावा सूक्ष्मातून देण्याचा प्रयत्न करूया.
ई. साधकांच्या मनातील गुरुदेवांप्रतीचा भाव, म्हणजेच या भ्रमणभाषचे ‘नेटवर्क’ आहे.
उ. सर्वसाधारण भ्रमणभाषवर आपण एखाद्या व्यक्तीला संपर्क (‘कॉल’) केला आणि ती व्यक्ती इतर कुणाशी बोलत असल्यास ‘व्यक्ती व्यस्त आहे’, असा संदेश आपल्याला ऐकू येतो; परंतु हा भ्रमणभाष गुरुदेवांचा असून तो ‘दैवी’ असल्यामुळे एका वेळी सहस्रो साधक गुरुदेवांशी या भ्रमणभाषद्वारे बोलू शकतात. खरोखर गुरुदेवांची ही किती कृपा आहे ! त्यामुळे आपण अखंड गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करूया.’
३. भावजागृतीचा प्रयोग ऐकल्यानंतर सत्संगात साधिकांनी केलेले आत्मनिवेदन

३ अ. कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १७ वर्षे) : ‘भावजागृतीचा प्रयोग ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले. ‘मी किती भाग्यवान आहे की, गुरुदेवांशी मला बोलण्याची संधी मिळत आहे !’, त्याबद्दल मला कृतज्ञता वाटली. नंतर मला पुष्कळ हलकेपणा जाणवला.’
३ आ. कु. कल्याणीस्वरूपा (नावाचा अर्थ ‘कल्याणकारी’) मुळे : ‘गुरुदेवांनी भावजागृती प्रयोगाच्या माध्यमातून माझे आत्मनिवेदन ऐकले’, असे वाटून त्याप्रती मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
४. कृतज्ञता
‘हे परमेश्वरस्वरूप, भक्तवत्सल गुरुमाऊली, तुमच्याच अनंत कृपेमुळे आम्हाला आज सूक्ष्मातून तुमच्याशी भ्रमणभाषवरून बोलण्याची संधी मिळाली. हे गुरुदेवा, आम्हा पामर जिवांना तुम्ही ही संधी दिली आहे’, याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे. हे गुरुदेवा, या भावजागृती प्रयोगाच्या माध्यमातून जे अनुसंधान तुमच्याशी साधले गेले आहे, ते अखंड राहू दे. हे गुरुदेवा, तुमच्या चरणी आम्ही कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १४ वर्षे), पुणे आणि कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय १४ वर्षे), फोंडा, गोवा. (७.१.२०२६)
| सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
मंदिरातील पुजारी मंदिराचे आध्यात्मिक वैभव वृद्धींगत करणारे असावेत !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !