
नवी देहली – पाकिस्तानने रमझानच्या पवित्र महिन्यात अफगाणिस्तानमधील भूभागावर केलेल्या हवाई आक्रमणांचा भारताने कडक शब्दांत निषेध केला आहे. या आक्रमणांमध्ये नागरिकांनी जीव गमावला असून यात विशेषतः महिला आणि मुले यांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे, असे परराष्ट्रमंत्र्यांच्या कार्यालयात सांगितले गेले आहे. पाकिस्तानने दावा केला की, तो आतंकवाद्यांना लक्ष्य करत होता. ‘हा दावा खोटा असून अनेक निरपराध नागरिकांचा जीव गेला’, असे अफगाण सरकारने म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पाकिस्तानने हे आक्रमण त्याच्या अंतर्गत अडचणींपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केले आहे. भारताने अफगाणिस्तानच्या विभागीय सार्वभौमत्व, क्षेत्रीय अखंडता आणि स्वातंत्र्य याला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
Panchkula Bomb Threat : पंचकुला (हरियाणा) महापौर कार्यालयासह हरियाणा आणि देहलीतील मंदिरे बाँबने उडवण्याची धमकी
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !