
काही जणांचा जन्म केवळ समाजाची दिशाभूल करण्यासाठीच झाला आहे कि काय ? असे वाटते. त्यांना कशाचेही निमित्त लागत नाही. सातारा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. या वेळी महाकालनगरी उज्जैन येथील अघोरी साधूंच्या मिरवणुकीच्या परंपरेची संकल्पना घेऊन सातारा जिल्ह्यातील एक कलापथक भव्य पदयात्रेत सहभागी झाले होते. महाकालनगरी उज्जैनमधील किंवा कुंभमेळ्यातील शोभायात्रेत अघोरी साधू मिरवणुकीत सहभागी होतांना वाद्ये वाजवत त्या तालावर जयघोष करत पुढे पुढे जातात. ही एक प्रकारची आध्यात्मिक स्तरावरील अभिव्यक्ती असते. त्यातून तांडव नृत्य, समाधी लागणे आदी प्रकारच्या अनुभूती उन्नत साधूंना येऊ शकतात. या मिरवणुकीची परंपरा दर्शवण्यासाठी सातारा येथील शिवजयंतीच्या मिरवणुकीत कलाकारांनी एक सादरीकरण केले होते; मात्र दुधात मिठाचा खडा टाकावा, याप्रमाणे शिवभक्तांच्या आनंदामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरजण घातले !

‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही’, असे सांगत या अघोरी नृत्य कलापथकाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रखर विरोध दर्शवला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी ‘या कलापथकाचा अविष्कार तातडीने रहित करावा’, अशी मागणी सातारा नगर परिषदेकडे केली. ‘सातारा नगर परिषदेकडून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावे ‘स्मृती पुरस्कार’ दिला जातो. त्यामुळे हा दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचाही अपमान आहे’, असे सांगण्यास डॉ. हमीद दाभोलकर विसरले नाहीत; मात्र कोणत्याही दबावाखाली न येता ‘केवळ परंपरा (आणि मनोरंजन) म्हणून या अघोरी नृत्य कलाविष्काराकडे पहाण्यात यावे. काही गरीब आणि गरजू कलाकारांचा उदरनिर्वाह या कला नृत्याविष्कारावर अवलंबून आहे, तसेच त्यांना नगर परिषदेकडून आगाऊ रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे हा आविष्कार होणारच आहे’, अशी ठाम भूमिका नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी घेतली.
वास्तविक या नृत्य कलाविष्कारामध्ये अंधश्रद्धेचा विषय कुठेच येत नाही; मात्र ज्यांना केवळ अविवेकी विरोध करायचा असतो, त्यांना हे कोण समजावून सांगणार ? सातारा नगर परिषद ही स्वायत्त स्थानिक स्वराज्य संस्था आहे. वैयक्तिक नाही. डॉ. दाभोलकरांच्या वारसदारांनी प्रशासनाला अशा प्रकारे वेठीस धरणे, हा निव्वळ अविवेकी विरोधच म्हणावा लागेल !
– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?