|

नवी देहली – ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या वर्ष २०२३-२४ च्या ‘रिलिजियस लँडस्केप स्टडी’नुसार अमेरिकेत हिंदू सर्वाधिक शिक्षित धार्मिक समुदाय असल्याचे समोर आले आहे. येथे ७० टक्के हिंदूंजवळ पदवी आहे. हा आकडा संपूर्ण अमेरिकेतील प्रौढांच्या सरासरीपेक्षा पुष्कळ अधिक आहे, जिथे केवळ ३५ टक्के लोकांकडे पदवी किंवा त्याहून उच्च शिक्षण आहे. हा अहवाल १९ फेब्रुवारीला सार्वजनिक करण्यात आला.
📊 Pew (2023–24 Religious Landscape Study): Hindus are the most educated religious group in the U.S.
70% of American Hindus hold a college degree – double the national average (35%).
Jews rank second at 65%.
Despite contributing strongly to society, Hindus still face racist… pic.twitter.com/5kKcPl3On7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 22, 2026
१. या अभ्यासानुसार हिंदूंनंतर ६५ टक्के ज्यू लोकांकडे पदवी किंवा त्याहून उच्च शिक्षण आहे. इतर धार्मिक समूहांमध्येही सरासरीपेक्षा अधिक शिक्षण पातळी दिसून आली आहे. मुसलमान, बौद्ध आणि ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती यांच्यामध्ये ४० टक्क्यांहून अधिक प्रौढांकडे किमान पदवी आहे.
२. मेनलाइन प्रोटेस्टंट ख्रिस्तीही राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक शिक्षित आहेत, तर इव्हँजेलिकल प्रोटेस्टंट, कॅथॉलिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या कृष्णवर्णीय प्रोटेस्टंट चर्च यांच्या सदस्यांमध्ये पदवीधरांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अल्प आहे.
३. १७ जुलै २०२३ ते ४ मार्च २०२४ या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले. यात एकूण ३६ सहस्र ९०८ अमेरिकी प्रौढांनी भाग घेतला.
४. ‘प्यू’च्या मते, या शैक्षणिक भेदाचे मोठे कारण स्थलांतर आणि लोकसंख्याशास्त्रीय नमुने आहेत. हिंदु, मुसलमान आणि बौद्ध धर्मांतील अनेक लोक उच्च शिक्षण किंवा कुशल कामगार कार्यक्रमांद्वारे अमेरिकेत पोचले, ज्यामुळे या धर्मांमध्ये उच्चशिक्षित लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे.
संपादकीय भूमिकाअमेरिकेतील सुशिक्षित आणि सुसंस्कृत हिंदू नेहमीच तेथील समाजाच्या उत्कर्षासाठी झटतात. असे असूनही त्यांच्यावर वर्णद्वेषी आक्रमणे करून त्यांची हेटाळणी होते, हे अमेरिकेसाठी लज्जास्पद ! |
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य