स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लंडन येथे अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सक्षम अधिकारी किंवा न्यायशास्त्र प्रयोगशाळेसमोर त्यांच्या आवाजाचा नमुना द्यावा. सक्षम न्यायवैधक प्राधिकरणाला यापूर्वी ‘रेकॉर्ड’वर (नोंदीत असलेला) असलेल्या ‘रेकॉर्डिंग’सह (ध्वनिमुद्रित) संकलित नमुन्यांचे वैज्ञानिक विश्लेषण आणि तुलना करण्याचे निर्देश द्यावेत, असा अर्ज तक्रारदार सात्यकी सावरकर यांनी विशेष न्यायालयात सादर केला. पुणे येथील एम्.पी.एम्.एल्.ए. विशेष न्यायालयात दाव्याची सुनावणी चालू आहे. बचाव पक्षाकडून तक्रारदार सात्यकी सावरकर यांची उलट पडताळणी चालू आहे. सात्यकी यांचे अधिवक्ता संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात आवाजाचे नमुने घेण्यासंबंधीचे निर्देश देण्याचा अर्ज केला.
राहुल गांधी यांचे अधिवक्ता मिलिंद पवार म्हणाले की, सात्यकी यांनी तत्कालीन न्यायाधीशांवर गंभीर आक्षेप घेत हे प्रकरण दुसरीकडे वर्ग करण्याविषयी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडे अर्ज केला होता. अर्जाची नोंद घेत प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी तत्कालीन न्यायाधीशांकडून तो गोपनीय अहवाल मागवला. तो अहवाल न्यायालयात सादर करण्यात यावा. यापुढील सुनावणी २३ फेब्रुवारी या दिवशी होईल.
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !