भिगवण (पुणे) येथे लग्न ठरलेल्या हिंदु तरुणीचे भरदिवसा अपहरण केल्याप्रकरणी २ मुसलमानांवर गुन्हा नोंद !

  • घटनेच्या निषेधार्थ भिगवण येथे सहस्रो हिंदुत्वनिष्ठांकडून आमदार पडळकर आणि आमदार जगताप यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन

  • आई-भावाला मारहाण करून, डोळ्यांत चटणी फेकून तरुणीला चारचाकीतून पळवले !

  • घटनेचा निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने भिगवण पोलीस ठाण्यावर मोर्चा

  • मुलीकडून ‘स्वत:च्या इच्छेने पळून गेली’, असा मुसलमानासमवेत व्हिडिओ प्रसारित

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर

भिगवण (जिल्हा पुणे) – येथे १७ फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता भिगवण शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागील रस्त्यावर तरुणीचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आले. या प्रकरणी हारून शेख आणि आयान हारून शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि तरुणीचा शोध तातडीने लावण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत सकल हिंदु समाजाच्या वतीने भिगवण येथे निषेध आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तरुणीकडून एक व्हिडिओ पोलीस आणि तिचे कुटुंबीय यांना पाठवून ‘स्वत:च्या मर्जीनेच तरुणासमवेत आले’, असे सांगितल्यावर पोलिसांनी आजच्या निषेध मोर्च्याला अनुमती नाकारली.

संबंधित तरुणी तिची आई आणि भाऊ यांसह दुचाकीवरून लग्नाची खरेदी करून स्वत:च्या घरी निघाली होती. शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागील रस्त्यावर येताच चारचाकी वाहनातून आलेल्या संशयित आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली. अचानक आक्रमण करत आरोपींनी तरुणी, तिची आई आणि भाऊ यांच्या डोळ्यांत चटणीची पूड फेकली. यानंतर तरुणीची आई आणि भाऊ यांच्या हातावर लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. दोघेही घायाळ अवस्थेत असतांना आरोपींनी तरुणीला बळजोरीने चारचाकी वाहनात ओढून बसवले आणि तेथून पसार झाले. या घटनेनंतर घायाळ कुटुंबियांनी तात्काळ भिगवण पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली.

तरुणीने मुसलमानाच्या समवेत व्हिडिओ प्रसारित केला

ही हिंदु तरुणी आणि मुसलमान तरुणी एकमेकांना लहानपणापासून ओळखत असल्याचे बोलले जात आहे. संबंधित तरुणीने मुसलमानासमवेत एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित करून ‘स्वत:च्या इच्छेने मी पळून गेली’, असे सांगितले.

मुलीकडून बळजोरीने व्हिडिओ करून घेतला ! – आमदार गोपीचंद पडळकर

या घटनेविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की, हा व्हिडिओ वेगळ्या ॲपच्या माध्यमातून मुलीने पोलीस आणि तिचे नातेवाईक यांना पाठवला. या वेगळ्या ॲपमुळे मुलीचे ‘लोकेशन’ (ठावठिकाणा) लक्षात आले नाही. यामुळे हा व्हिडिओ मुलीकडून बळजोरीने करून घेतला आहे, हे लक्षात येते. धर्मांधाला कुणाचातरी पाठिंबा आहे. त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत, तो अन्य प्रकरणात आरोपी आहे. त्यामुळे मी पोलिसांना भेटणार आहे. हा पोलिसांचा गुंडाला वाचवण्याचा प्रयत्न आहे.

संपादकीय भूमिका

  • पूर्वी मुसलमान आक्रमणकर्ते हिंदु तरुणी आणि महिला यांचे दिवसाढवळ्या अपहरण करत असत. आता छत्रपती शिवरायांच्या राज्यात अशा घटना पुन्हा घडत आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !
  • जे बांगलादेश आणि पाकिस्तान येथे घडते, ते आता भारतात घडत आहे. यावरून त्यांना कायद्याचा कसलाही धाक उरलेला नाही, हेच स्पष्ट होते. जर भररस्त्यात पालकांच्या समोरून मुलींचे अपहरण होत असेल, तर उद्या घराघरांत हे मुसलमान शिरण्यास मागे-पुढे पहाणार नाहीत. पोलिसांनी त्यांना अटक करून कठोर शिक्षा देण्याची आवश्यकता आहे !