देशद्रोही कृत्यावर पांघरूण घालण्यासाठी मालेगावच्या उपमहापौरांनी राज्यघटनेचा आधार घेत स्वतःची जात सांगितली !

मालेगाव (जिल्हा नाशिक) – क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उदात्तीकरण केल्यामुळे चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यावर मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी आता नवा कांगावा चालू केला आहे. ‘मी ओबीसी असल्याने मला लक्ष्य केले जात आहे’, असे सांगून त्यांनी या वादाला जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हे, तर ‘टिपूच्या सैन्यात अनेक ब्राह्मण अधिकारी होते’, असा तर्कविसंगत दावा करून त्यांनी हिंदु समाजात फूट पाडण्याचे आणि टिपूच्या अत्याचारी इतिहासाचे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. (हिंदूंनी आता मुसलमानांचा कावेबाजपणा ओळखायला हवा ! – संपादक)
उपमहापौरांचे हास्यास्पद दावे आणि वस्तूस्थिती !
उपमहापौर शान-ए-हिंद यांनी दावा केला की, राज्यघटनेत टिपूचा उल्लेख आहे. (‘राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर काही चित्रे आहेत, याचा अर्थ टिपूच्या धर्मांध कृत्यांना मान्यता देता येते’, असा होत नाही. राज्यघटनेचा आधार घेऊन हिंदुद्वेष्ट्यांचे उदात्तीकरण करणे, हा निव्वळ धूर्तपणा आहे ! – संपादक) माझ्या दालनात छायाचित्र लावल्यानंतर टिपूच्या कार्याची माहिती अनेकांना कळली, असे सांगत त्यांनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले. (टिपूचे उदात्तीकरण करून ‘चोर तो चोर वर शिरजोर’, अशा आविर्भावात वागणार्या उपमहापौर शान-ए-हिंद ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !