कर्नाटकातील काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांचा जळफळाट !

बेंगळुरू – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एक भूत असेल, तर भाजप त्याची सावली आहे. आपण सावलीशी लढत आहोत, भूताशी लढलो, तरच देशाचा उद्धार होईल, असे विधान कर्नाटकाचे ग्रामीण विकास मंत्री तथा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी येथे केले. शहरातील गांधी भवन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार इर्शाद उप्पिनंगडी यांच्या ‘ब्लड अँड टीयर्स ऑफ द कोस्ट’ (किनारपट्टीचे रक्त आणि अश्रू) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. रा.स्व. संघाच्या मागे एक मोठा अवैध ‘मनी लाँडरिंग’चा (काळ्या पैशाला पांढरे करण्याची प्रक्रिया) धंदा आहे, असा गंभीर आरोप प्रियांक खर्गे यांनी या वेळी केला.
खर्गे म्हणाले, ‘‘मी आता रा.स्व. संघाविषयी थोडा सखोल अभ्यास करत आहे. संघाला ‘तुमच्याकडे एवढा पैसा कुठून येतो ?’, असे विचारले तर त्याच्याकडे उत्तर नसते, तसेच ‘संघाची नोंदणी झाली पाहिजे’, असे सांगितले, तर ‘नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, ही व्यक्तींची संघटना आहे’, असे सरसंघचालक मोहन भागवत सांगतात. ‘आज ना उद्या संघाची नोंदणी झालीच पाहिजे. मी ती करून घेईन’, असे खर्गे म्हणाले.
संपादकीय भूमिकाहिंदुत्वनिष्ठ संघटनेला पाण्यात पहाणार्या काँग्रेसच्या मंत्र्यांना त्यांच्या राज्यात धर्मांधांच्या कारवायांची नोंद घेण्यासाठी वेळ नाही. संघाच्या मागे लागण्याऐवजी थोडी शक्ती धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी वापरली असती, तर कर्नाटकात एव्हाना कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली असती ! |
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक