परात्पर गुरु पांडे महाराज यांचे विचारधन !

आज १५.७.२०२६ या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांची ७ वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

परात्पर गुरु पांडे महाराज         

शिस्तबद्ध जीवन जगण्याचे महत्त्व !

‘आपल्याला इतरांनी नियम सांगितल्यावर त्यांचे पालन करतांना आपल्याला ताण येतो. यासाठी व्रत म्हणून स्वतःच स्वतःला नियम (शिस्त) लावून घेतल्यास आपले सामर्थ्य वाढते आणि आपल्याला आनंद मिळतो.’

‘आपल्या आत्म्यामध्ये एवढी महान शक्ती आहे की, ‘त्या शक्तीचा योग्य उपयोग होण्यासाठी भगवंताने आपल्याला शरीररूपी यंत्र दिले आहे.’ त्याला ‘आत्मशोधक यंत्र’ म्हणतात. या महान यंत्राद्वारेच भगवद्प्राप्ती होऊ शकते.

आपल्याला या जन्मात ही शक्ती प्राप्त होण्यासाठी आपल्या जीवनात परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत. त्यांच्या आज्ञेनुसार आपण साधना करून सर्वकाही साध्य करू शकतो. परात्पर गुरु डॉक्टरच आपल्याला सेवेसाठी शक्ती पुरवत असतात; पण आपण साधक अभागी आहोत. आपल्याला त्यांची शक्ती त्या प्रमाणात अजूनही ग्रहण करता आलेली नाही.’

– परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

मुसलमानांमधील संघटितपणा आणि धर्मवेड !

‘मुसलमान दिवसातून ५ वेळा नमाजाची वेळ झाली की, जेथे जागा मिळेल तेथे बैठक टाकून लगेच नमाजपठण चालू करतात. त्यामुळे काय होते ? त्या वेळेला त्यांची साधनेची शक्ती कार्यरत होते. सर्वत्रचे मुसलमान त्या वेळी नमाजपठण करत असल्यामुळे ती शक्ती ब्रह्मांडात कार्य करते. धर्मांध मुसलमान ती शक्ती वाईट कामांसाठी उपयोगात आणत असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे साधना करूनही त्यांना फलश्रुती मिळत नाही.’

– परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


         

मायेचा प्रभाव न्यून करण्यासाठी जागृत रहा आणि भगवंताचे नामस्मरण करा !

‘मायेला उघडे करणे, म्हणजे चैतन्य प्रकट करणे. मायेला उघडे केले की, त्यातून ब्रह्म प्रकट होते.

आज मायेचा प्रभाव वाढला आहे. ‘काळी शक्ती आणि रज-तमाचा प्रभाव’, यांकडे गांभीर्याने न पाहिल्याने ते आपल्या पाठीमागे भूतासारखे लागले आहेत. हे लक्षात घेऊन आपण घाबरून न जाता, सामर्थ्याने, भगवंताचे साहाय्य घेऊन, म्हणजेच त्याचे नामस्मरण करत मायेला सामोरे गेल्यास तीच पळून जाईल.

‘भगवंत प्रत्येकाला संधी देतो. प्रत्येकाने त्या संधीचा लाभ घेऊन आपले भाग्य उजळून घ्यावे.’

– परात्पर गुरु पांडे महाराज

यासाठी भक्तजनहो, जागृत रहा !’

– परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.