इतिहास आणि मंदिर अभ्यासक सौ. शेफाली वैद्य यांच्या विशेष शैलीतून उतरलेला तांबडी सुर्ल गावातील महादेव मंदिराचा इतिहास आणि सौंदर्यवर्णन येथे दिले आहे, जे न केवळ आपली मंदिरसंस्कृती आणि महादेव या दोहोंवरील श्रद्धा वाढवेल; परंतु हे मंदिर अन् महादेव दोघांचेही दर्शन घेण्यासाठीही आपले मन प्रतीक्षा करील !

शिळा जंगलातून वाहून आणून घडवलेले मंदिर !
पहिल्या दिवशी दुपारी आम्ही निघालो गोव्यातील एका अप्रतिम मंदिराकडे ! अनमोड घाटाच्या अगदी पायथ्याशी, निसर्गरम्य परिसरात उभे असलेले तांबडी सुर्ल या गावातील महादेव मंदिर म्हणजे १२ व्या शतकातील कदंब-यादव नागर स्थापत्य शैलीचे गोव्यातील परकियांच्या आक्रमणातून वाचून अस्तित्वात राहिलेले एकमेव शैलमंदिर, काळ्या ‘बेसॉल्ट’ दगडात घडवलेले ! हा दगड स्थानिक नाही. कर्नाटकमधून त्या काळात मोठमोठ्या शिळा इकडे आणून बांधलेले हे मंदिर आहे. तेव्हा लोकांनी त्या शिळा इतक्या घनदाट जंगलातून कशा आणल्या असतील ? ते तो एकटा महादेवच जाणे !
– सौ. शेफाली वैद्य
गोवा म्हणजे मजा नव्हे, तर मंदिरसंस्कृती !
आज गोव्याची ओळख जगात आहे, ती तेथील समुद्रकिनार्यांमुळे, तेथील ‘फन अँड फेनी’ (मजा आणि फेणी) या जाणीवपूर्वक करून दिलेल्या ‘इमेज’मुळे (‘प्रतिमे’मुळे) ! हो, या गोष्टी गोव्याचा अविभाज्य भाग आहेत; पण केवळ एक भाग. खरा गोवा या गोष्टींच्या फार पलीकडे आहे. गोवा म्हणजे केवळ सोनेरी वाळूचे समुद्रकिनारे नाहीत, कॅसिनो नाही, मौजमजा नाही, तर गोवा म्हणजे देवळात दरवळणारा धूपाचा सुगंध, गुलाबी जाईच्या कळ्यांनी शृंगारलेली देवीची मूर्ती, मंदिरापुढच्या दीपस्तंभावर तेवणार्या शेकडो ज्योती आणि मंदिरातील घंटानादाने भारलेली पहाट आहे ! आणि या सर्व गोष्टी जिवंत ठेवण्यासाठी गोव्याने भरपूर किंमतही मोजलेली आहे !

पोर्तुगिजांनी केलेला विध्वंस आणि मूर्तीचे स्थानांतर !
पुढे जेव्हा सोळाव्या शतकात पोर्तुगिजांचे पांढरे पाय जेव्हा या पवित्र भूमीवर पडले तेव्हा त्यांनी येथील मंदिरांचा प्रचंड विध्वंस केला, तेव्हा या गावातील कात्यायनी ‘बाणेश्वर’ मंदिरही पाडले गेले. सुदैवाने त्यातील मूर्ती लोकांनी कर्नाटकमध्ये अवेरसा येथे हालवली होती; पण मंदिर तोडले गेले, तरी गावाचे नाव तेच राहिले,…आपल्या भूतकाळाची साक्ष पटवत…! पोर्तुगिजांनी त्याचे ‘बेनावलीम’ केले.
देवतांच्या मूर्तींचे देवकोष्ठ !

गर्भगृहाबाहेरच्या भिंतींवरच्या छोट्या देवकोष्ठांमध्ये श्री गणेश, महिषासुरमर्दिनी, विष्णु आणि नागदेवता यांच्या सुरेख मूर्ती आहेत. ललाटबिंबावर गणपति आहे. गाभार्यात छोटेसे पण सुबक शिवलिंग आहे. त्यावर अभिषेक केल्यावर त्याचे पाणी बाहेर जायला बाहेरच्या बाजूला मकर प्रणाळ आहे. मंदिराचे शिखर नागर शैलीतील आहे. वरचा आमलक आणि कलश आता नष्ट झालेत. अंतराळावर छोटीशी शुकनासी आहे. शिखरावरच्या देवकोष्ठांमध्ये उमा-महेश, भैरव, ब्रह्मा, जनार्दन, विष्णु-लक्ष्मी आणि शंकराच्या आकाराने छोट्या; पण अत्यंत सुरेख मूर्ती आहेत. प्रत्येक मूर्तीच्या वर सुबक कीर्तीमुख आहे.
– सौ. शेफाली वैद्य
शिळा जोडून घडवलेले मंदिराचे उतरते छत !

मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि सकाळचे पहिले सूर्यकिरण थेट गाभार्यातील शिवलिंगावर पडतात. मंदिराचा सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि शिखर सर्व काळ्या ‘बेसाल्ट’मध्ये घडवलेले आहेत. मंदिर एककूट आहे, म्हणजे एकच सभामंडप आणि एकच गर्भगृह. सभामंडपाचे छत उतरते आहे आणि अजस्त्र अशा दगडी शिळा जोडून ते घडवलेले आहे. गोव्यातील मुसळधार पावसाला तोंड देण्यासाठी उतरते छत हवे म्हणून ही रचना केलेली आहे.
या छताचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक दगडी शिळा जोडून हे छत घडवलेले आहे; पण दुरून पहातांना वाटते की, हे छत एकपाषाणी आहे.
सभामंडप आणि स्तंभाच्या नक्षीमागील वैशिष्ट्यपूर्ण इतिहास !

सभामंडपाला ३ बाजूंनी प्रवेशद्वार आहे आणि येणार्या भाविकांना बसण्यासाठी कक्षासनांची सोय आहे. सभामंडपाच्या मधोमध ४ पूर्ण स्तंभ आहेत आणि मध्ये रंगिशळा आहे. सभामंडपाच्या छतावर अप्रतिम अशी अष्टकोनी कमळे कोरलेली आहेत, तसेच चारही कोपर्यांत कीर्तीमुखे आहेत. पूर्ण स्तंभांचे तळ चौकोनी आणि वरचा भाग गोल आहे आणि त्यावर अगदी नाजूक नक्षी कोरलेली आहे. एका स्तंभावर घोड्याला त्याच्या सोंडेत घेऊन भिरकावणारा हत्ती आहे, जे कदंब कुळाचे राजचिन्ह होते. असे मानले जाते की, हे मंदिर कदंब राजा शिवचित्त परमादीदेव आणि त्याची राणी कमलादेवी यांच्या कार्यकाळात बांधले गेले.
चाकोरीबाहेरचे गोवादर्शन !

हा चाकोरीबाहेरचा गोवा सहसा पर्यटकांना दिसत नाही, समजत नाही; पण ज्या सुंदर, आपुलकीने भरलेल्या, परंपरांनी सजलेल्या गोव्यात मी लहानाची मोठी झाले, त्या गोव्याची ओळख गोव्याबाहेरच्या लोकांना करून द्यायला मला मनापासून आवडते. म्हणून ‘एन्शंट ट्रॅलीज’समवेत वर्षातून एक सहल करते आणि माझ्या हृदयातील गोवा माझ्या दृष्टीतून लोकांना दाखवते. या वर्षी या सहलीमध्ये १५ लोक होते. पुणे, नागपूर, चेन्नई आणि बेंगळुरू या वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले.
परशुरामांनी बाण मारला म्हणून बाणवली !
आम्ही उतरलो होतो बाणावलीला, दक्षिण गोव्यात. गोव्याचा इतिहास या गावाच्या नावापासूनच चालू होतो. असे म्हणतात की, परशुरामाने पश्चिम समुद्रात ७ बाण मारून सप्तकोकण निर्मिले, त्यांतील ‘अपरांत’ हा प्रदेश म्हणजेच आजचा गोवा. परशुरामाचा बाण बाणावली येथे पडला म्हणून गावाचे नाव ‘बाणावली.’
– सौ. शेफाली वैद्य
वर्ष १९३५ मध्ये मंदिर पुन्हा जगासमोर आले !

आकाराने लहानसे, तरीही शिस्तबद्ध स्थापत्य असलेले हे देखणे मंदिर टिकून राहिले ते जंगलात असल्यामुळे. पुष्कळ वर्षे हे मंदिर लोकांच्या स्मृतींतून गेलेलेच होते. ते पुन्हा जगासमोर आणले, अनंत शेणवी धुमे या व्यक्तीने ते तब्बल १९३५ या वर्षी ! लोकांच्या विस्मृतीत गेल्यामुळेच हे मंदिर टिकून राहिले !
कदंबकालीन स्थापत्य आणि सांस्कृतिक जिद्दीचे प्रतीक !
आज हे मंदिर भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले असून त्यांच्या अखत्यारीत येते. मंदिराचे काही भाग काळाच्या ओघात नष्ट झाले असले, तरीही येथील शिल्पे, स्तंभ आणि शिवलिंग आज ८०० वर्षांनंतरही कदंबकालीन स्थापत्य आणि गोव्याच्या सांस्कृतिक जिद्दीचे प्रतीक बनून उभी आहेत. अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेले हे मंदिर पहातांना माझ्यासमवेत आलेले सगळेच लोक भारावून गेले होते.
संध्याकाळी परत हॉटेलवर आलो, तरी सर्वांच्या बोलण्यात या मंदिराशिवाय दुसरा विषय नव्हता. आजही या मंदिरासमोर उभे राहिले की, जाणवतो तो इथल्या नीरव शांततेचा जड भार, इतिहासाचा स्पर्श आणि काळ्या दगडांतून जिवंत होणारी अमर श्रद्धा !
– सौ. शेफाली वैद्य, हिंदुत्वनिष्ठ लेखिका आणि व्याख्यात्या, पुणे.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !