
ढाका (बांगलादेश) – मौलवी बाजार जिल्ह्यात ११ फेब्रुवारी या दिवशी रतन शुवो कर या २८ वर्षीय हिंदु युवकाची हत्या करण्यात आली. मृतदेह सापडल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रतन कर हे इस्लामपूर युनियनमधील चंपारा चहाच्या मळ्यात काम करत होते. पोलिसांना त्यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला. स्थानिक वृत्तांनुसार रतन कर यांच्या शरिरावर जखमांच्या अनेक खुणा होत्या आणि मृतदेह रक्ताने माखलेला होता.
🚨 Hindu Youth Murdered in Bangladesh – How Long Will This Continue?
A Hindu youth working at a tea garden has been killed in Moulvibazar, Bangladesh amid rising reports of attacks on Hindus.
Regimes may change, but will the atrocities stop?
India cannot stay indifferent.… https://t.co/8QHb5lKMGg pic.twitter.com/AK5Scw33c5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 13, 2026
१. बांगलादेशातील ‘द डेली स्टार’ या वृत्तपत्राच्या अहवालानुसार ११ फेब्रुवारी सकाळी १० वाजता चहाच्या मळ्यात काम करणार्या लोकांना रतन शुवो कर यांचा मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
२. रतनसह काम करणार्या लोकांनी आरोप केला आहे की, त्यांची हत्या अन्यत्र करून मृतदेह मळ्यात फेकण्यात आला; मात्र याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
३. रतन यांचा मोठा भाऊ लक्ष्मण कर यांनी सांगितले की, १० फेब्रुवारीला रात्रीपासून रतन घरी परतला नव्हता. कुटुंबियांनी संपूर्ण रात्र त्याचा शोध घेतला. सकाळी मळ्यात मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. हत्येचे कारण समजत नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
४. सतत घडणार्या घटनांविषयी मानवाधिकार संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘ह्यूमन राईट्स सपोर्ट सोसायटी’च्या माहितीनुसार मागील १७ महिन्यांत राजकीय हिंसाचारात किमान १९५ जणांचा मृत्यू झाला असून ११ सहस्र २२९ जण घायाळ झाले आहेत.
संपादकीय भूमिकाबांगलादेशात हिंदूंचा वंशविच्छेद चालू असतांना तो रोखण्यासाठी भारत सरकार काय प्रयत्न करणार ? |
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !