हिंदु जनजागृती समितीची प्रशासकीय अधिकारी आणि विद्यालयांचे प्रशासन यांच्याकडे मागणी

पणजी, १२ फेब्रुवारी (पत्रक) – व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मडगाव येथील जिल्हाधिकारी, वास्कोचे उपजिल्हाधिकारी, पोलीस ठाणे आणि विद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर सुसंस्कार व्हावे, यासाठी तेथे ‘व्हॅलेंटाईन डे’ ऐवजी ‘मातृ-पितृ पूजन दिन’ साजरा करावा, अशी मागणी विद्यालयांच्या व्यवस्थापनाकडे करण्यात आली आहे.
वास्को येथील उच्च माध्यमिक विद्यालय, उपजिल्हाधिकारी आणि पोलीस ठाणे यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री उदय इब्रामपूरकर, शिवराम रेवणकर, अरविंद आडरकर आणि रवींद्र साळगांवकर यांची उपस्थिती होती, तर मडगाव येथे दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना शिष्टमंडळामध्ये श्री. संजीव पाटील, सौ. नंदा नागवेकर आणि श्री. सुधाकर आगलावे यांची उपस्थिती होती.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा व्यावसायिक लाभासाठी सर्वत्र रूढ झाली आहे. यामुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडत आहेत. या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या (कंडोम्सच्या) विक्रीत वाढ होत आहे. त्याचप्रमाणे काही धर्मांध युवक हे युवतींना खोटी नावे सांगून त्यांना ‘लव्ह जिहाद’चा बळी बनवतात. महाविद्यालयांत ‘व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम, तसेच भारतीय संस्कृतीची महती सांगणार्या व्याख्यानाचे आयोजन करणे, महाविद्यालयात ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यास अनुमती न देणे आणि या दिवशी गैरप्रकार आढळल्यास त्वरित कारवाई करणे, अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !