
‘१४.१२.२०२५ या दिवशी रात्री देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सेवा करून मी निवासाकडे परत निघालो होतो. तेव्हा मी ‘उबर’ टॅक्सी भाड्याने घेतली. प्रवासात मी चालकाला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील प्रदर्शन’, तसेच ‘जीवनातील धर्म आणि धर्मकार्य यांचे महत्त्व’, यांविषयी थोडक्यात माहिती सांगितली. ही माहिती चालकाने एकाग्रतेने ऐकली. मागील ३० वर्षांपासून मी सनातन संस्थेच्या माध्यमातून पूर्णवेळ धर्मकार्य करत असल्याचे त्यांना सांगितले. त्या वेळी चालकाने मला ‘ते स्वतः ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे स्वयंसेवक आहेत’, असे सांगितले. मी गाडीतून उतरत असतांना त्यांनी माझ्याकडून भाड्याचे पैसे घेण्यास नकार दिला; पण मी त्यांना आग्रहाने पैसे दिले. मी पूर्णवेळ धर्मकार्य करत आहे; म्हणून त्यांनी माझ्याविषयी आदर व्यक्त करतांना मला वाकून नमस्कार केला.’
– श्री. नंदकुमार कैमल, कोची, केरळ. (१६.१२.२०२५)
| इथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे