मुसलमान दुकानदाराच्या कृत्याला समर्थन दिल्यावरून ‘महंमद दीपक’ला हिंदूंचा संघटित विरोध !

मुसलमान दुकानदाराने त्याच्या दुकानाचे नाव ‘बाबा गारमेंट्स’ ठेवल्यावरून हिंदुत्वनिष्ठांनी दर्शवला होता विरोध

कोटद्वार (उत्तराखंड) – येथे वकील अहमद नावाच्या एका मुसलमान दुकानदाराने त्याच्या दुकानाचे नाव ‘बाबा गारमेंट्स’ ठेवल्यावरून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यास तीव्र विरोध दर्शवला होता. ‘बाबा हे नाव मुसलमान दुकानदार ठेवू शकत नाही’, अशी त्यांची भूमिका होती. येथे सिद्धबली नावाचे हनुमानाचे मंदिर आहे, ज्यास ‘सिद्धबली बाबा’ असेही म्हटले जाते. त्यामुळे हा वाद निर्माण झाला. या वेळी दीपक कुमार नावाच्या हिंदु व्यक्तीने स्वत:चे नाव ‘महंमद दीपक’ सांगत दुकानदार वकील अहमद याची बाजू घेतली. तो हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात उभा ठाकला. यामुळे हिंदुत्वनिष्ठांनी त्यालाही विरोध करण्यास आरंभले. दीपक कुमार याची एक व्यायामशाळा (जिम) असून या प्रसंगामुळे हिंदूंनी त्याच्यावर सामूहिक बहिष्कार टाकला आहे. त्याच्या व्यायामशाळेत येणार्‍या १५० लोकांपैकी बर्‍याच जणांनी सदस्यत्व रहित केल्यामुळे व्यायामशाळेत जाणार्‍यांची संख्या १५ वर पोचली आहे.

हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे दीपक कुमारला दाखवत आहेत पीडित !

आता या घटनेवरून हिंदूंच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न काही हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे करत आहेत. ‘दीपक व्यायामशाळेतून त्याच्या कुटुंबाची उपजीविका चालवत होता. मुसलमान दुकानदाराला वाचवण्याची किंमत दीपक कुमारला चुकवावी लागत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी हिंदुत्वनिष्ठांनी दीपक कुमारच्या व्यायामशाळेसमोरही आंदोलन केले. कोटद्वारच्या बद्रीनाथ मार्गावर असेल्या ‘हल्क जिम’चा मालक दीपक कुमार आता आर्थिक संकटाचा सामना करत आहे. व्यायामशाळेच्या सभासदांची संख्या १५० वरून १५ वर आल्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत’, अशा प्रकारे मुसलमानाचे समर्थन करणार्‍या दीपक कुमारची पाठराखण काही प्रसारमाध्यमे करत आहेत. दीपक याने एक व्हिडिओ प्रसारित करून म्हटले की, व्यायामशाळेचे मासिक भाडे ४० सहस्र रुपये आहे. घरावरील कर्जाचा हप्ता १६ सहस्र रुपये आहे.

संपादकीय भूमिका

  • धर्मशिक्षणाच्या अभावी आज अनेक हिंदू सर्वधर्मसमभावाच्या पोकळ कथानकाला बळी पडतात. त्याचेच हे उदाहरण !
  • अशा हिंदुद्वेष्ट्या प्रसारमाध्यमांवरही हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटणार नाही !