आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली माहिती

गौहत्ती (आसाम) – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी राज्यातील बेकायदेशीर नियंत्रणे हटवण्याच्या मोहिमेवर प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की, गेल्या २ दिवसांत राज्यातील श्रीभूमी जिल्ह्यात ६६० हेक्टर वनभूमी अतिक्रमणमुक्त करण्यात आली असून २२० हेक्टर भूमी अद्याप परत मिळवणे शेष आहे. ८ फेब्रुवारीला अधिकार्यांनी १२ सहस्र हेक्टरपेक्षा अधिक अतिक्रमित मालमत्ता परत मिळवण्याच्या प्रयत्नात पाथरकांडी मतदारसंघातील राखीव जंगलांमधील बेकायदेशीर वस्त्यांवर महत्त्वपूर्ण कारवाई चालू केली. २ सहस्रांहून अधिक कुटुंबांना तेथून बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले.
🚨 ASSAM SHOWS THE WAY 🚨
CM Himanta Biswa Sarma drops big numbers 👇
🌳 660 hectares of forest land freed in just 2 days in Assam’s Sribhumi district, after 912 acres were earlier reclaimed in Hailakandi.This is what decisive governance looks like.
🇮🇳 Now the big question:… https://t.co/P5p1Ibi00s pic.twitter.com/i38ui9Uhkr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 10, 2026
१. ईश्वरपार, माधवपूर, बलिया, मधुरबोंड, चागलमोया, मागुरा आणि जोगीसोरा यांसह अनेक गावांतील बेकायदेशीर रहिवाशांना विशिष्ट समयमर्यादेत वनभूमी सोडण्याचे निर्देश देण्यात आले.
२. बेकायदेशीर घरे, तात्पुरत्या इमारती आणि वाढलेली वनस्पती तोडून परिसराला त्याच्या मूळ जंगल स्थितीत परत आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.
३. अधिकार्यांच्या मते, हा उपक्रम वनक्षेत्रांचे पुनर्वसन करण्यासाठी आणि पुढील अतिक्रमणे थांबवण्यासाठी सततच्या कार्यक्रमाचा एक घटक आहे.
संपादकीय भूमिकाअतिक्रमणाच्या विरोधात आसाममधील भाजप शासनाने जी रोखठोक भूमिका घेतली, तशीच भूमिका अन्य भाजपशासित सरकारे केव्हा घेणार आहेत, असा प्रश्न राष्ट्रप्रेमी विचारत आहेत ! |
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद
Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूर (बिहार) येथे खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू, तर २० हून अधिक घायाळ
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र