|

वॉर्साे (पोलंड) – रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती अधिक गंभीर होण्यापासून रोखले. वर्ष २०२२ च्या शेवटास पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी थेट चर्चा केली होती. या चर्चेत युक्रेनमध्ये अण्वस्त्रांचा वापर टाळण्यासाठी मोदी यांनी रशियाला माघार घेण्यास सिद्ध केले होते. हे पंतप्रधान मोदी यांच्या सकारात्मक आणि उत्तरदायी जागतिक भूमिकेचे उदाहरण आहे, असे मत पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री व्लादिस्लाव बार्टोशेव्स्की यांनी मांडले. एका भारतीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
PM Narendra Modi's influence prevented a nuclear strike by Russia on Ukraine! 🇮🇳🇷🇺🇺🇦
Władysław Bartoszewski, Poland's Deputy Foreign Minister, highlights India's rising stature, stating that Poland views India as a "responsible global power." 🌍💪#RussiaUkraineWar pic.twitter.com/SUEuCCAU1u
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 7, 2026
बार्टोशेव्स्की म्हणाले की…,
१. आज भारत जगात ज्या प्रकारची भूमिका बजावत आहे, ती दुर्लक्षित करता येणार नाही. पोलंड भारतासमवेतच्या संबंधांना अत्यंत महत्त्व देतो आणि भारताकडे एक उत्तरदायी जागतिक शक्ती म्हणून पहातो.
२. भारताने अमेरिकेसमवेत इतर देशांच्या तुलनेत अधिक लाभदायक व्यापार करार केला आहे. भारत ही अत्यंत मोठी आर्थिक शक्ती आहे. सकल देशांतर्गत उत्पादनाच्या संदर्भात भारत चौथ्या क्रमांकावर असून लवकरच तिसर्या क्रमांकावर पोचण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे. अनुमाने दीड अब्ज लोकसंख्या असलेला भारत हा मोठा आणि प्रगत बाजार आहे. त्यामुळे अशा क्षमतेच्या देशाकडे दुर्लक्ष करणे शहाणपणाचे ठरणार नाही.
३. आमचे भारतासमवेतचे संबंध अतिशय चांगले आहेत.
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister