मदरशांच्या इमारतीच्या बांधकामाला पैसे कुठून मिळाले, याचाही शोध घेणार !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने राज्यातील सर्व मदरशांच्या आर्थिक व्यवहारांची सविस्तर चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मदरशांना मिळणार्या विदेशी निधीची माहिती देण्यास त्यांना सांगितले आहे. तसेच मदरशांच्या इमारत बांधकामावर किती खर्च झाला आणि त्या निधीचा प्रत्यक्ष स्रोत काय होता ? याची माहिती घेतली जाणार आहे. यासाठी आतंकवादविरोधी पथकाचे विशेष अन्वेषण पथक तपासणी करणार आहे. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकार्यांना अन्वेषण पथकाला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सुमारे ४ सहस्र मदरशांमध्ये परदेशी निधी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही प्रकरणांमध्ये उत्पन्नाचा स्पष्ट स्रोत नसतांनाही अनेक मदरसे भव्य इमारतींमध्ये चालवले जात असल्याचे समोर आले आहे.
४ वेळा तपासणी झाली आहे ! – मौलाना रझवी

‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शाहाबुद्दीन रझवी यांनी सांगितले की, उत्तरप्रदेश सरकार वारंवार मदरशांच्या तपासाचे आदेश देत आहे. सरकारला मदरशांमध्ये नेमके काय शोधायचे आहे किंवा काय नवे शोधायचे आहे ?, हे स्पष्ट नाही; मात्र सरकारी आदेशाला आक्षेप नाही. यापूर्वी ४ वेळा तपास झाला असून ५ व्या तपासासाठीही मदरसे सिद्ध आहेत. (साळसूदपणाचा आव आणणारे मौलाना रझवी ! मुळात मदरशांत घडणार्या गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड असल्याने मदरशांवर आता बंदीच घातली गेली पाहिजे, हेच खरे ! – संपादक)
संपादकीय भूमिकामुळात देशभरातील मदरशांची अशी तपासणी केली पाहिजे आणि त्याच्या पुढे जाऊन देशात मदरसा शिक्षण पद्धत बंद केली पाहिजे ! |
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court