|

ढाका (बांगलादेश) – आधुनिकतेच्या नावाखाली महिलांना सार्वजनिक जीवनात ढकलले जाते, म्हणजेच त्यांना काम करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे त्यांचे शोषण होते आणि समाजाचे नैतिक अधःपतन घडते, उदाहरणार्थ वेश्याव्यवसाय, असा महिलांचा अवमान करणारा असंवेदनशील मजकूर कट्टर राजकीय पक्ष असलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’चे प्रमुख शफीकुर रहमान यांनी सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित केला होता. या माध्यमातून त्यांनी एकप्रकारे ‘नोकरी-व्यवसाय करणार्या सर्वच महिला वेश्या आहेत’, असे सुचवायचे होते. या वक्तव्यास तीव्र विरोध होऊ लागल्यावर त्यांनी तो मजकूर हटवला. बांगलादेशामध्ये १० दिवसांनंतर सार्वत्रिक निवडणूक होणार असतांना असा मजकूर प्रसारित झाल्याने यास अधिकच विरोध होत आहे.
⚠️Bangladesh: Jam@at-e-I$l@mi chief Shafiqur Rahman compares working women to pro$t!tvtes.
The misogynistic post was deleted after widespread outrage.
It is hardly surprising that an extremist outfit like Jam@at-e-I$l@mi would circulate such ant!-women content. If this party… pic.twitter.com/c2chj389yN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 3, 2026
आता ही वादग्रस्त पोस्ट हटवून सारवासारव करण्याचा प्रयत्न चालू आहे. ‘जमात-ए-इस्लामी’ पक्षाने खाते ‘हॅक’ (दुसर्या अयोग्य शक्तींकडून नियंत्रित) झाल्याचा दावा आता करण्यात येत आहे. मजकूर हटवण्यापूर्वीच तो लाखो लोकांपर्यंत पोचला होता. ‘जमात-ए-इस्लामी’चे साहाय्यक सरचिटणीस आणि माध्यम प्रमुख अधिवक्ता अहसानुल महबूब जुबैर याने सांगितले की, सायबर आक्रमणकर्त्यांनी काही काळ खात्यावर नियंत्रण मिळवले होते. ती भूमिका रहमान यांच्या किंवा पक्षाच्या भूमिकेचे प्रतिबिंब नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संपाकीदय भूमिका‘जमात-ए-इस्लामी’सारख्या कट्टरतावादी पक्षाकडून असा महिलाविरोधी मजकूर प्रसारित केला जाणे, यात कोणतेच आश्चर्य नाही ! खरेतर जर उद्या बांगलादेशात या पक्षाची सत्ता आली, तर तो ‘बांगलादेशाचा तालिबान’ बनून महिलाविरोधी निर्णय घेण्यासही मागे-पुढे पहाणार नाही, हे लक्षात ठेवा ! |
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !