‘मला काही दिवसांसाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालतांना साधिकेच्या समवेत एका कावळ्यानेही प्रदक्षिणा घालणे
१८.४.२०२५ या दिवशी सकाळी १० वाजता मी देवद आश्रमाच्या परिसरात असलेल्या औदुंबर वृक्षाला दत्ताचा नामजप करत प्रदक्षिणा घालत होते. मी दुसरी प्रदक्षिणा घालत असतांना तेथे एक कावळा आला. तो माझ्यापुढे येऊन औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालू लागला. त्याने असे २ वेळा केले. मी मनातूनच त्याला विचारले, ‘आपण कोण आहात आणि औदुंबराला प्रदक्षिणा का घालत आहात ?’
२. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर डोळे मिटून नमस्कार करतांना साधिकेला डोळ्यांसमोर परात्पर गुरु पांडे महाराज यांचा हसतमुख चेहरा दिसणे आणि त्यांनी ‘तुझ्या माहेरचे सर्व पितर मुक्त होतील’, असा आशीर्वाद देणे
माझ्या प्रदक्षिणा घालून पूर्ण झाल्यानंतर मी डोळे बंद करून नमस्कार केला. तेव्हा मला माझ्या मिटलेल्या डोळ्यांसमोर परात्पर गुरु पांडे महाराज दिसले. त्यांच्या पाठीमागे मला पुष्कळ पिवळा प्रकाश दिसला. देवद आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांचे पूर्वी वास्तव्य असलेल्या खोलीत त्यांचे छायाचित्र आहे. त्या छायाचित्रातील त्यांचा चेहरा हसतमुख आणि पिवळा दिसतो. माझ्या डोळ्यांसमोर परात्पर गुरु पांडे महाराज यांचा तसाच चेहरा दिसला आणि ‘तुझ्या माहेरचे सर्व पितर मुक्त होतील’, असा त्यांनी मला आशीर्वाद दिला. त्या वेळी मला पुष्कळ छान वाटले आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली. नंतर लगेच तो कावळा उडून शेजारच्या झाडावर जाऊन बसला.
मला अशा सुंदर अनुभूती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. प्राजक्ता संदीप नावडकर, सातारा (२२.४.२०२५)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !