‘जमात-ए-इस्लामी’ला मोकळा हात दिल्यास भारताची वाढू शकते डोकेदुखी !

ढाका (बांगलादेश) – १२ फेब्रुवारीला बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. अवामी लीगच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातून बाहेर काढल्यानंतर सध्याच्या महंमद युनूस यांच्या सरकारने त्यांच्या पक्षावरच बंदी घातली आहे. त्यामुळे १०-१२ दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुका लोकशाहीविरोधी असल्याचे म्हणता येईल. अशातच मुख्य विरोधी राजकीय पक्ष असलेला ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ सरकार स्थापन करेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान हे पुढील पंतप्रधान बनणार, असे म्हटले जात आहे. विशेष असे की, १७ वर्षांच्या प्रदीर्घ वनवासानंतर रहमान हे २५ डिसेंबर २०२५ या दिवशी लंडनहून ढाक्यात परतले. वर्ष २००८ मध्ये भ्रष्टाचार आणि सुरक्षा प्रकरणी आरोप झाल्यापासून ते लंडनमध्ये वास्तव्य करत होते. ढाक्यात आल्यावर त्यांनी स्वतःला ‘नवीन बांगलादेशाचा नेता’ म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. वर्ष २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर रहमान यांच्यावरील आरोप आणि शिक्षा रहित करण्यात आल्या.
तारिक रहमान भारताकडे ‘मैत्रीचा हात’ पुढे करण्याची शक्यता !
ऐतिहासिकदृष्ट्या ‘बी.एन्.पी.’चा कल भारतविरोधी आणि पाकिस्तानकडे झुकलेला राहिला आहे; मात्र वर्ष २०२६ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रहमान यांनी आपली भूमिका पालटल्याचे दिसून येत आहे. ‘बांगलादेश फर्स्ट’ची (बांगलादेश प्रथम) घोषणा करतांना रहमान यांनी ‘द टाईम’ या अमेरिकी नियतकालिकाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘भारतासमवेत वैर पत्करणे बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेसाठी परवडणारे नाही’, हे ओळखले आहे. त्यामुळे त्यांनी भारताकडे ‘मैत्रीचा हात’ पुढे केला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची भेट घेतली होती.
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
Bengal Border Fencing : बंगालमध्ये सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दल पोचल्यावर गावकर्यांनी वाटली मिठाई !
बांगलादेशात नवीन सरकार येऊन १०० दिवस झाले, तरी हिंदू असुरक्षितच !
Donald Trump Buffalo : बांगलादेशात ‘डॉनल्ड ट्रम्प’ नावाच्या म्हशीची बकरी ईदच्या दिवशी होणारी हत्या रहित !
संपादकीय : बांगलादेशाचे १०० दिवस आणि हिंदू !
बॉर्डर गार्ड बांगलादेश आणि सीमा सुरक्षा दल यांच्यात होत आहेत चकमकी