भारतीय राजनैतिक अधिकार्याने चूक दाखवल्यावर दिले स्पष्टीकरण

ढाका (बांगलादेश) – येथे आयोजित एका कार्यक्रमात भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला. या नकाशात जम्मू-काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखवण्यात आले होते; मात्र कार्यक्रमात उपस्थित असलेल्या भारतीय राजनैतिक अधिकार्याने यावर त्वरित तीव्र आक्षेप घेतला आणि जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे घटनास्थळीच स्पष्ट केले.
ढाका येथे ‘बांगलादेश इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज’कडून एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला भारतीय उच्चायुक्तांच्या द्वितीय सचिव पूजा कुमारी झा याही उपस्थित होत्या. परिषदेत बांगलादेशाचे माजी राजनैतिक अधिकारी तारिक ए. करीम यांनी एक नकाशा दाखवला. या नकाशात जम्मू-काश्मीर पाकिस्तानचा भाग दर्शवण्यात आला होता. यावर पूजा कुमारी झा यांनी तात्काळ आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या की, दाखवण्यात आलेला भारताचा नकाशा चुकीचा आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर हा पाकिस्तानचा भाग दाखवला आहे. प्रत्यक्षात जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. येथे दाखवलेला नकाशा पूर्णपणे चुकीचा आहे.
बांगलादेशाने दिले स्पष्टीकरण
भारतीय राजनैतिक अधिकार्याच्या तीव्र आक्षेपानंतर तारिक ए. करीम यांनी स्पष्टीकरण देतांना सांगितले की, या नकाशाचा वापर केवळ प्रातिनिधिक (सांकेतिक) उद्देशासाठी करण्यात आला होता आणि नकाशात दाखवलेल्या सीमा वास्तविक नाहीत.
भारतीय वंशाच्या व्यक्तीने इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींची फसवणूक केल्याचा आरोप
सीरियाची राजधानी दमास्कस जेथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थांबले होते, त्या भागात लागोपाठ ४ बाँबस्फोट : ३ जणांचा मृत्यू
अमरनाथ यात्रेच्या पहिल्या ५ दिवसांतच गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग वितळले
ओमानच्या समुद्रात एका नौकेवर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण : इराणवर संशय
Europe Heatwave : युरोपातील २३ देशांत विक्रमी उष्णतेची लाट : ११ लाख कोटी रुपयांची हानी
कर्नाटकातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला संघाच्या नेत्याने बजावली कायदेशीर नोटीस