
इस्लामाबाद (पाकिस्तान) – बलुचिस्तान प्रांतात ‘बलुच लिबरेशन आर्मी’ (बी.एल्.ए.)च्या सैनिकांनी पाकिस्तानी सैन्यदलावर आक्रमण केले. या आक्रमणात पाकिस्तानचे १२ सैनिक ठार झाले, तर ६ सैनिक घायाळ झाले. पंजगुर जिल्ह्यात झालेल्या या चकमकीत पाकिस्तानी सैनिकांना लक्ष्य करण्यात आल्याचे ‘बी.एल्.ए.’च्या प्रवक्त्याने सांगितले.
१. ‘बी.एल्.ए.’चा प्रवक्ता जीयांद बलुच याने सांगितले की, सोराप भागात पाकिस्तानी सैन्यदलाची एक तुकडी घुसण्याचा प्रयत्न करत असतांना तिच्यावर आक्रमण करण्यात आले. या कारवाईत पाकिस्तानच्या सैन्यदलाची एक गाडी पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली.
२. जीयांद बलुच याने या आक्रमणाला ‘बलुच राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी चालू असलेल्या सशस्त्र संघर्षाचा भाग’ असे म्हटले आहे. तो म्हणाला की, आमचा गट यापुढेही पाकिस्तानी सैन्यदलाला लक्ष्य करणे चालूच ठेवेल.
३. बलुचिस्तानमधील दुसर्या एका गटाने, म्हणजेच ‘बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट’ने (बी.एल्.एफ्.) देखील पाकिस्तानी सैन्यदलाच्या तळावर आक्रमण केल्याचा दावा केला आहे. ‘बी.एल्.एफ.’चा प्रवक्ता मेजर ग्वाहरम बलुच याने सांगितले की, सैनिकांनी बालिचाह भागात पाकिस्तानच्या तळावर ‘ग्रॅनेड-लाँचर’ने आक्रमण केले.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !