कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे वक्तव्य

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘दुसर्या देशात जाऊन मी माझ्या देशाविरुद्ध बोलणार नाही’, असे कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. ‘राहुल गांधी भारताची अर्थव्यवस्था ठीक नाही’, असे म्हणत असतांना तुम्ही भारताचे कौतुक केले आहे’, या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या अर्थाने ते विधान केले आहे, हे मला ठाऊक नाही. त्यांनी देशाविरुद्ध विधान केलेले नाही, तर अंतर्गत व्यवस्थेविषयी भाष्य केले आहे. (अर्थव्यवस्था म्हणजे अंतर्गत व्यवस्था नाही, हे शेंबड्या पोरालाही कळेल. मूळ प्रश्नाला बगल देणारे काँग्रेसचे शिवकुमार यांचा निषेध करावा तेवढा थोडा ! – संपादक) ‘राजकारणासाठी मी भारताची निंदा करू शकत नाही’, असेही शिवकुमार या वेळी म्हणाले.
“I won’t speak against my country abroad,” says D. K. Shivakumar, Karnataka Dy CM.
Good – but that’s basic patriotism, not a flex
Why say it at all? And will he now advise senior leaders of his own party who routinely tarnish India’s image overseas? pic.twitter.com/YnFBAMi3nq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 26, 2026
शिवकुमार पुढे म्हणाले,
‘मला थोडाफार राजकीय अनुभव आहे, त्या आधारावर मी हे बोललो आहे. मी इतर कुठल्याही देशात जाऊन माझ्या देशाला अडथळा आणू शकत नाही. आम्ही आमच्या देशाला न्यून लेखू शकत नाही. प्रथम आम्ही भारतीय आहोत. मी देशावर प्रेम करतो आणि त्याचा आदर करतो. भारताच्या विकासात आम्हा सर्वांचे योगदान आहे.’
संपादकीय भूमिकाकोणत्याही राष्ट्रनिष्ठ राजकारण्याकडून हे अपेक्षित असतांना हे सांगण्याची आवश्यकता काय ? त्यामुळे असे विधान करण्यापेक्षा देशप्रेमाचा उमाळा आलेले शिवकुमार देशाची अस्मिता विदेशात धुळीस मिळवणार्या स्वत:च्या पक्षातील वरिष्ठांना याविषयी समज देणार का ? |
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !