
मूर्तीजापूर (जिल्हा अकोला) – राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी आणि प्लास्टिकच्या ध्वजांमुळे होणारी विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मूर्तीजापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या साधिका कु. साक्षी श्रीराव, कु. आकांक्षा हजारे, कु. दीक्षा अहिरवार आणि सौ. स्मिता महामुने उपस्थित होत्या. अकोला येथेही जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदने देण्यात आली आहेत. स्थानिक शाळांमधील शिक्षकांची भेट घेऊन प्रबोधनाची अनुमती मागण्यात आली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रांतीकारकांचा इतिहास लोकांपर्यंत पोचवण्यासाठी समितीच्या वतीने अकोला आणि मूर्तीजापूर येथे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
अकोला शहरस्थळ – ब्रजलाल बियाणी स्मारकाच्या बाजूला, बस स्टँड समोर, गांधी रोड, अकोला. क्रांतीकारक फ्लेक्स प्रदर्शन – सकाळी १० ते दुपारी १ भारतमातेचे पूजन – सकाळी १०.३० सामूहिक संपूर्ण वन्दे मातरम् – सकाळी १०.३० राष्ट्रविषयक ग्रंथप्रदर्शन – सकाळी १० ते दुपारी १ |
मूर्तीजापूर शहरस्थळ – जळमकर इंडस्ट्रीज जवळ, तहसील रोड, मूर्तीजापूर. वेळ – सकाळी १० ते दुपारी १ उपक्रम – भव्य क्रांतीकारक फ्लेक्स प्रदर्शनी (सकाळी १०.३० वाजता भारतमातेचे पूजन आणि संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने सोहळ्यास प्रारंभ होईल.) |
अकोला शहर आणि जिल्ह्यातील सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनांचा लाभ घेऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याच्या या मोहिमेत बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी