सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन
अ. लोकप्रतिनिधी
सांगली विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांना, तसेच लेंगरे (विटा) येथे सरपंच श्रीमती राधिका बागल यांना निवेदन देण्यात आले.
आ. प्रशासन
१. मिरज येथे नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत व्यापारी सेनेचे श्री. पंडित (तात्या) कराडे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विठ्ठल मुगळखोड उपस्थित होते.
२. तासगाव येथे नायब तहसीलदार नागेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव आणि शिक्षण गटविकास अधिकारी डॉ. सुरेश शंकर पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना कामगार संघटना उपजिल्हाप्रमुख श्री. सचिन चव्हाण, कुमठे येथील धर्माभिमानी श्री. प्रवीण चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रशांत चव्हाण, राजेंद्र माळी आणि गजानन खेराडकर उपस्थित होते.
३. शिरोळ येथे निवासी नायब तहसीलदार श्री. योगेश जमदाडे यांना, तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना निवेदन देण्यात आले.
इ. शाळा
मिरज येथे ए.सी.एस् इंग्लिश स्कूल, शिरोळ येथे श्री पद्माराजे विद्यापीठ येथे मुख्याध्यापक श्री. सी.एस्. पाटील यांना, क्रांतीवीर दत्ताजीराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय प्रकाशनगर, सोनी येथे प्राचार्य प्रवीण चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.











बेळगाव, खानापूर येथे प्रशासन, पोलीस, शिक्षण विभागात निवेदन !
हिंदु जनजागृती समितीचे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियान !
बेळगाव, २६ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियानाच्या अंतर्गत बेळगाव आणि खानापूर येथे प्रशासन, पोलीस, शिक्षण विभागात निवेदन देण्यात आले.
१. जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार मंजुनाथ जानकी (उजवीकडे) यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सौ. मिलन पवार, सौ. प्रणाली पवार, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्ज्वला गावडे आणि श्री. विजय नंदगडकर उपस्थित होते.

२. खानापूर येथे तहसीलदार प्रवीण जैन यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भाजप कार्यकर्ते श्री. बाळाराम सावंत, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सदानंद मासेकर, रमेश शिगनाळकर, बबन मन्नोळकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. जिवाप्पा मयेकर आणि श्री. कोणेरी कुम्रतवाडकर, तसेच सनातन संस्थेचे श्री. हणमंत होनगेकर उपस्थित होते.

३. बेळगाव येथे शिक्षण विभागात बी.आर्. वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सौ. उज्ज्वला गावडे आणि सौ. वैशाली यादव उपस्थित होत्या.

४. बेळगाव येथे गुन्हा आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी स्नेहा पी.व्ही. यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्ज्वला गावडे, सौ. वैशाली यादव आणि श्री. विजय नंदगडकर उपस्थित होते.

हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !
भाजपचे आमदार शंकर जगताप यांचे सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र
‘शौर्य प्रशिक्षण शिबिरा’त ३२५ हून अधिक तरुण-तरुणींनी घेतला सहभाग !