वसंत ऋतूत काय खावे ? आणि काय खाऊ नये ?

मार्च आणि एप्रिल (वातावरण लक्षणांप्रमाणे थोडे पुढे मागे) या कालावधीत सूर्याच्या उष्णतेने थंडीत गोठलेला कफ बाहेर यायला प्रारंभ होतो. त्यामुळे या ऋतूमध्ये सर्दी, खोकला आणि ताप यांसारखे आजार बळावतात.

प्रतिदिनच्‍या दिनक्रमात पाळता येण्‍यासारखे काही नियम

सकाळी ६ वाजण्‍याच्‍या आत उठावे. पोट साफ झाल्‍यावरच काहीही आहार किंवा द्रव पोटात घ्‍यावे.