भाजपचे माजी नगरसेवक सुनील कामाठी यांचे निधन !

सुनील कामठी यांनी खड्डा तालीमच्‍या माध्‍यमातून मोठे संघटन उभे केले होते. महाराष्‍ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील ६०० हून अधिक श्री शिवजन्‍मोत्‍सव मंडळांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्‍या सिंहासनाधिष्‍ठित मूर्तीचे वाटप आणि अन्‍य भरीव समाज कार्य यांमुळे ते लोकप्रिय होते.

हिंदूंनो, देश आणि धर्म यांच्या रक्षणाप्रीत्यर्थ सिद्ध व्हा ! – टी. राजासिंह 

येथे २६ फेब्रुवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने आयोजित झालेल्या विराट ‘हिंदु गर्जना मोर्च्या’मध्ये त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. मोर्च्यामध्ये ३० सहस्रांहून अधिक हिंदूंनी उपस्थित राहून लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या बंदी कायद्यांच्या मागणीचा जोर धरला होता.

सोलापूर येथे २६ फेब्रुवारी या दिवशी ‘हिंदू गर्जना मोर्चा’ !

येथे सकल हिंदु समाजाच्‍या वतीने २६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ३ वाजता ‘हिंदु गर्जना मोर्चा’चे आयोजन करण्‍यात आले आहे. ‘लव्‍ह जिहाद’, ‘धर्मांतर’ आणि ‘गोहत्‍या बंदी कायदा’ राज्‍यासह संपूर्ण देशात लागू करण्‍यात यावा या प्रमुख मागण्‍यांसाठी या मोर्च्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे.

देशातील अमर्याद भूमी बळकावण्‍याचा अधिकार देणारा वक्‍फ कायदा त्‍वरित रहित करा ! – विक्रम घोडके, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांची हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी, श्री तुळजाभवानी मंदिरातील देवनिधी लुटणार्‍यांवर कारवाई करा !

सोलापूर महापालिकेतील ३४० अत्यावश्यक पदांची भरती करण्यात येणार !

वास्तविक महापालिकेतील एकूण १ सहस्र १२५ पदे रिक्त आहेत. त्यातील ३४० अत्यावश्यक पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये कनिष्ट अभियंता, उद्यान कर्मचारी, अग्नीशमनदल यांसह अत्यावश्यक पदांचा समावेश रहाणार आहे.

सोलापूर महानगरपालिकेचे १ सहस्र ७५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर !

सोलापूर महानगरपालिकेला विविध गोष्टींतून मिळणारे उत्पन्न ६७७ कोटी २७ लाख ४७ सहस्र रुपये दाखवण्यात आले असून भांडवली कामांसाठी उपलब्ध होणारी रक्कम ७० कोटी ४८ लाख रुपये इतकी दाखवण्यात आली आहे.

भीमा नदीपात्रात प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची साकारण्यात आली प्रतिकृती !

छत्रपती शिवराय आणि प्रभु श्रीराम या योद्ध्यांचा पराक्रम अनमोल आहे. यासाठी त्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या असल्याचे नगरे यांनी सांगितले. प्रतिकृतींच्या दर्शनासाठी भोई समाजाच्या वतीने विनामूल्य होडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाळणा सोहळ्यासाठी येणार्‍या महिलांना विनामूल्य घरी सोडण्याची व्यवस्था करणार ! – शीतल तेली उगले, आयुक्त, सोलापूर महापालिका

दूरच्या ठिकाणी रहाणार्‍या महिलांना महापालिकेच्या वतीने विनामूल्य घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक संख्येने महिला असलेल्या मार्गांची सूची आम्ही आयोजकांकडे मागितली आहे, अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

हिंदूंच्‍या व्‍यापक संघटनासाठी सोलापूर येथे १५ फेब्रुवारीला हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

‘‘लव्‍ह जिहाद, धर्मांतर, हलाल जिहाद यांसारख्‍या हिंदूंवरील आघातांना वाचा फोडण्‍यासाठी सोलापूर येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा महत्त्वपूर्ण ठरेल.’’

हुबळी-गदग एक्‍सप्रेस १५ फेब्रुवारीपर्यंत रहित !

कर्नाटकातील गुळेदगुंड ते बदामी या दुहेरी मार्गचे काम ७ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत हाती घेण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे सोलापूर ते हुबळी, हुबळी ते सोलापूर, सोलापूर ते गदग, गदग ते सोलापूर एक्‍सप्रेस १५ फेब्रुवारीपर्यंत रहित करण्‍यात आली आहे.