आदेश देऊनही पुणे शहरातील बहुमजली इमारतींवरील ‘रुफ टॉप हॉटेल्स’वर कारवाई नाही !

बहुमजली इमारतींचा लाभ घेत शहरांमध्ये ‘रुफ टॉप हॉटेल’ नावाची संकल्पना पुढे येत आहे; मात्र ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. अशा हॉटेल्सना महापालिका, जिल्हाधिकारी प्रशासन यांच्याकडून अनुमती दिली जात नाही.

श्रीराममंदिरानंतर आता काशी आणि मथुरा मुक्तीसाठी कृतीशील व्हा ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

ही सभा यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. या वेळी महिला, युवती, तसेच गावातील तरुण उपस्थित होते.

श्रीराममंदिर झाले, आता ‘रामराज्य’ आणण्यासाठी प्रयत्न करूया ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

सभेचा आरंभ प्रार्थना आणि श्री गणेशाच्या श्लोकाने करण्यात आला. हिंदु जनजागृती सभेच्या व्यापक कार्याची ओळख करून देणारी ध्वनीचित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली.

मनोज जरांगे मनुवादी वृत्तीचे ! – माजी आमदार 

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये शाहू, फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार आणि प्रतिमा दिसत नाही, त्यामुळे जरांगे हे मनुवादी वृत्तीचे असल्याचे लक्षात येते, असा आरोप माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केला.

२५५ दिवसांपासून आंदोलनाची नोंद न घेतल्याने उपोषणस्थळीच आंदोलनकर्त्याची आत्महत्या !

‘माझ्या मरणाला सरकार उत्तरदायी आहे; परंतु कार्यकर्त्यांनी आंदोलनाची चळवळ बंद करू नये, हीच माझी शेवटची इच्छा’, अशी चिठ्ठी लिहून उपोषण मंडपातच गळफास घेऊन आंदोलनकर्त्याने आत्महत्या केली.

रामराज्याच्या दिशेने वाटचालीसाठी ३० जानेवारीला हुपरी (कोल्हापूर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते केवळ स्वराज्य नव्हे, तर ‘हिंदवी स्वराज्य’ होते. आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करत आहोत, अन् दुसरीकडे अयोध्येत भव्य श्रीराममंदिरात रामलला विराजमान झाले आहेत.

मुंबई पोलीस नालायक ! – निखिल वागळे

‘मुंबई पोलीस नालायक आहेत. तक्रारीची पोचही ४८ घंट्यांत नाही. माहीम पोलीस ठाणे तर भंगारात विकले पाहिजे. आमेन (निश्चित)’, असे अपशब्द वापरून पुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांनी त्यांचा राग ‘एक्स’वर व्यक्त केला.

प्रभु श्रीरामाप्रमाणे आदर्श आचरण करून स्वतःमध्ये रामराज्य निर्माण करूया ! – सुनील कदम, हिदु जनजागृती समिती

प्रभु श्रीराम हे आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श बंधू, तसेच आदर्श शत्रू होते. त्यांचे गुण स्वतःमध्ये आणून अंतःकरणात रामराज्य निर्माण करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी केले.

सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणार्या दोघांना मुंब्रा पोलिसांनी केली अटक

डॉ. पप्पूकुमार बोदेसम गौतम या व्यक्तीने प्रभु श्रीराम यांच्या संदर्भातील धार्मिक श्रद्धा दुखावण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करून हिंदु धर्मियांच्या श्रद्धास्थानाचा अपमान केला होता.

१३ सहस्र रुपयांची लाच घेतांना मंडल अधिकारी आणि तलाठी यांना रंगेहात पकडले !

१३ सहस्र रुपयांची लाच घेतांना फलटण येथील मंडल अधिकारी जितेंद्र कोंडके आणि सजा फलटणच्या तलाठी श्रीमती रोमा कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.