क्षात्रतेजापेक्षा साधनेचे ब्राह्मतेज महत्त्वाचे !

‘एखाद्या सात्त्विक राजाचे चरित्र वाचून थोडा वेळ उत्साह वाटतो; पण ऋषिमुनींचे चरित्र आणि शिकवण वाचून अधिक काळ उत्साह वाटतो अन् साधनेला दिशा मिळते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले                   

विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे !

‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

बुद्धीप्रामाण्यवादी आणि संत

‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्वरप्राप्ती करून देणारे संत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु धर्माची महानता !

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर धर्म, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे उदात्त ध्येय असणारा हिंदु धर्म !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले            

एकमेवाद्वितीय हिंदु धर्म !

‘ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी  आमीष दाखवावे  लागते, मुसलमानांना धमकवावे लागते, तर हिंदु धर्मातील ज्ञानामुळे इतर पंथीय हिंदु धर्माकडे आकर्षित होतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आधीच्या युगांत स्वभावदोष अल्प असल्याने एखाद्या साधनामार्गाने साधना करून साधक पुढे जात.

कलियुगात स्वभावदोष अनेक असल्याने आधी ते दूर करावे लागतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले           

भक्तीचे महत्त्व !

‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कुणाची ओळख असल्याखेरीज होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले       

अतीशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘साधना  करून सूक्ष्मातील कळायला लागले की,  यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतीशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’-  (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

कीर्तनकार आणि गुरु यांच्यातील भेद !

‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले