संतांची सुवचने
सनातनच्या प्रत्येक साधकामध्ये अध्यात्मात प्रगती करण्याची क्षमता असल्यामुळे सर्वांनी झोकून देऊन प्रयत्न करावेत !
सनातनच्या प्रत्येक साधकामध्ये अध्यात्मात प्रगती करण्याची क्षमता असल्यामुळे सर्वांनी झोकून देऊन प्रयत्न करावेत !
‘लहानपणापासून सात्त्विकता वाढवणारी साधना न शिकवल्याने सर्वत्र भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, खून इत्यादी वाढले आहेत, हेही सरकारला कळत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली राजकारण्याविषयी कुणी अर्वाच्च बोलू शकत नाही; पण देवतांविषयी बोलतात ! आपल्याला हे पालटायचे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हिंदु धर्मात चार वर्ण आहेत. त्यावर टीका करतांना बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि इतर धर्मियांना कळत नाही की, सर्वच क्षेत्रांत तसे आहे. साधनेच्या संदर्भात इतके भेद असणे, हे हिंदु धर्माचे अद्वितीयत्व दर्शवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हिंदूंनो, गेल्या ९०० वर्षांच्या पारतंत्र्याचा लज्जास्पद इतिहास पुसण्यासाठी आता जागृत व्हा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘मानवाला साधना आणि अध्यात्म न शिकवता त्याला ‘सुखी जीवन जगता यावे’, यासाठी विविध उपकरणे देणार्या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे आणि जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतरच राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘काश्मीरनंतर भारतातील ज्या ज्या गावांत धर्मांध बहुसंख्य आहेत, त्यांनी ‘आम्हाला पाकिस्तानशी जोडा’, अशी मागणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कोणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांबरोबर दुरावा, भांडण होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या अन् निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्याला मते देणार्या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापेक्षा ‘ईश्वराने भक्त म्हणून निवडणे अनंत पटींनी महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले