केवळ प्रवचने नकोत, तर हेही करा !
‘रामायण, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींवर केवळ प्रवचने नकोत, तर वानरसेना, मावळे सिद्ध करायला हवेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘रामायण, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींवर केवळ प्रवचने नकोत, तर वानरसेना, मावळे सिद्ध करायला हवेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भारतापासून पाकिस्तान आणि बांगलादेश स्वतंत्र होणे, भारतातील धर्मांधांनी ‘काश्मीर पाकिस्तानचा आहे’, असे म्हणणे आणि भारतात सर्वत्र आतंकवादी असणे, ही अहिंसावादी महात्मा गांधी आणि काँग्रेस यांची भारताला देणगी आहे. त्या विचारसरणींना हरवून हिंदु राष्ट्राची स्थापना केल्यावरच भारताची सर्वच क्षेत्रांत प्रगती होईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘राजकारण्यांना पैसे देऊन कार्यकर्ते जमवावे लागतात, तर संतांकडे त्यांना अर्पण देणारे कार्यकर्ते, म्हणजे साधक आणि शिष्य असतात.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘इतर धर्म भीती अथवा लालूच दाखवून परधर्मियांना आपल्या धर्मात खेचतात, तर हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेमुळे आनंदप्राप्ती होत असल्याने इतर धर्मीय हिंदु धर्माकडे आपोआप आकर्षित होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे अन् जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतर राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेतले जाते. बाकी कुणाचेच घेतले जात नाही.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘मुलांनी श्रीमंत बापाची संपत्ती उधळून लावावी, तसे हिंदूंनी केले आहे. सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांपासून चालत आलेल्या हिंदु धर्मातील ज्ञानाला तुच्छ लेखून हिंदु धर्माची स्थिती केविलवाणी केली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सांप्रदायिक साधनेतील बहुतेक भक्तांची प्रगती न झाल्यामुळे त्यांचा साधनेवरचा विश्वास डळमळीत होतो. असे होऊ नये म्हणून ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा सिद्धांत लक्षात घेऊन संप्रदायांच्या प्रमुखांनी तसे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी विविध साधनामार्गांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘बहुतांशी अन्य पंथीय पैशांची लालूच दाखवून, कपटाने किंवा बळजबरीने हिंदूंना आपल्या पंथात ओढतात; मात्र हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेचे महत्त्व कळल्यावर सुजाण अन्य पंथीय हिंदु धर्माचे पालन करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भारतातील हिंदू स्वतःचे आणि सरकार हिंदूंचे रक्षण करू शकत नाहीत. असे हिंदू आणि सरकार पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंचे कधी रक्षण करू शकेल का ? हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले