भाजपच्या नुपूर शर्मा यांना अटक करण्यासाठी मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रस्ता बंद आंदोलन !

नुपूर शर्मा यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे निदर्शने करून दारूल फलाह मशिदीसमोर रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.

धर्म : गोळी कि चैतन्याचे बीज ?

‘धर्म अफूची गोळी आहे कि चैतन्याचे बीज ?’, हे येत्या काळात संपूर्ण विश्वाला लक्षात येईल !

(म्हणे), ‘धर्माची गोळी दिली की, लोक झोपून रहातात हे त्यांना ठाऊक आहे !’ – जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आजपर्यंत केवळ धर्म-जात यांच्या आधारावरच राजकारण केले. नेहमीच अल्पसंख्याकांना चुचकारण्याचे काम केले. आता हिंदू जागृत होत असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पितळ उघडे पडत असल्याने जितेंद्र आव्हाड सारख्यांना पोटशूळ होऊन ते अशी वक्तव्ये करत आहेत, हे जनता ओळखून आहे !

(म्हणे) ‘हिंदु महासंघाची शपथ, म्हणजे बहिष्कार आणि वर्णवर्चस्ववाद !’ – जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

हिंदु महासंघाच्या कार्यकर्त्यांनी ‘ज्या दुकानावर भगवे स्टिकर आहे, त्याच दुकानातून वस्तू खरेदी करू’, अशी शपथ घेतली. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘हिंदु महासंघाची ही शपथ, म्हणजे बहिष्कार आणि वर्णवर्चस्ववाद आहे.’’

दाऊद इब्राहिमच्या बहिणीचा अंगरक्षक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता !

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या चौकशीत माहिती आली समोर

(म्हणे) ‘वाराणसीमधील मंदिर जेवढे जुने तेवढीच ज्ञानवापी मशीदही जुनी !’

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर पाडून तेथे ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली, याचे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. भविष्यात न्यायालयातही हे सिद्ध होईल; तरीही सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असणारे हे सत्य पवार का नाकारत आहेत, हे हिंदू जाणून आहेत !

बैठकीत आरक्षणाचा मुद्दा निघालाच नाही ! – ब्राह्मण महासंघाचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ‘ब्राह्मणांना आरक्षण हवे’, हे सूत्रच आले नाही. यासंबंधी सर्व ठिकाणी विपर्यस्त वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ‘कुणालाच आरक्षण नको’, अशी काही जणांची भूमिका होती…

अभिनेत्री केतकी चितळे यांना ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ४ दिवसांची पोलीस कोठडी !

अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तींविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात वर्ष २०२० मध्येही ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या आशीर्वादाने राज्यात सरकार पुरस्कृत आतंकवाद माजला !

राज्याचे गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असल्यामुळे दंगेखोर कार्यकर्त्यांवर कारवाई न करता आतंकवादास सामोरे जाणार्‍यांवरच कारवाई केली जात असल्याने सत्ताधार्‍यांकडून जाणीवपूर्वक राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याची शंका !

पारवा (जिल्हा यवतमाळ) येथे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या !

जिल्ह्यातील पारवा या गावात महादेव मंदिराजवळ १६ मे या दिवशी अनिल ओचावार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची गळा चिरून हत्या करण्यात आली.