कोल्हापूर – पंचगंगा नदीवरील वळीवडे येथील बंधार्यात सहस्रो मासे प्रदूषणाने मृत्यूमुखी पडल्याचा प्रकार उघड झाला आहे. याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाने काहीही म्हटलेले नाही. नदीत मिसळणार्या दूषित पाण्यामुळे हे मासे मृत्यूमुखी पडले आहेत. हे मासे घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. हे मृत मासे अनेकांनी चारचाकी वाहनात भरून नेले. त्यामुळे हे मासे अनेक उपाहारगृहात, तसेच बाजारात विक्री होण्याची दाट शक्यता असल्याने प्रदूषित मासे खाऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. जानेवारीमध्ये असाच प्रकार भोगावती नदीपात्राच्या संदर्भातही झाला होता. त्या वेळेसही पाणी प्रदूषित झाल्याने पाण्यातील सहस्रो मासे मृत्यूमुखी पडल्याने पाण्यावर तरंगत होते. त्या वेळेसही प्रदूषण मंडळाने याकडे कागदी घोडे नाचवण्याच्या पलीकडे काहीच केले नव्हते.
संपादकीय भूमिका :केवळ हिंदूंच्या सणांना कार्यरत होणारे आणि वर्षभर झोपा काढणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ ! |