धार्मिक पद्धतीने विवाह केल्याने देवतांचे कृपाशीर्वाद मिळतात !

विवाहासारखा रज-तमात्मक प्रसंगही सात्त्विक करून त्याला अध्यात्माची जोड देऊन देवतांचे कृपाशीर्वाद प्राप्त करण्याची संधी हिंदु धर्माने दिली आहे.

हिंदु धर्मशास्त्रानुसार (धार्मिक पद्धतीने) विवाहविधी केल्यामुळे वधूवरांना झालेले आध्यात्मिक स्तरावरील लाभ

विवाहासाठी इच्छुक असणार्‍या स्त्रीपुरुषांनी हिंदु धर्मशास्त्रानुसारच विवाह करावा; कारण असा विवाहच व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर लाभदायक ठरतो.

ब्राह्मतेजाने आणि क्षात्रतेजाने तळपणारे राजराजेश्वर परशुराम !

भगवान परशुरामाने कार्तवीर्यार्जुनाचा वध करून स्वतःचे क्षात्रतेज प्रकट केले. त्या वेळी त्यांचे स्वरूप मेरुमंत्राने वर्णिले आहे. सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शाबरस्वरूप परशुराम पर्णकुटीच्या बाहेर पडत आहेत.

हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे विवाहसंस्थेचे जतन करा !

सध्याच्या काळानुसार विवाहाकरिता पुरुषासाठी २५ ते ३० वर्षे आणि स्त्रीसाठी २० ते २५ वर्षे, ही वयोमर्यादा सर्वोत्तम समजली जाते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ही वयोमर्यादा आदर्श आहे.

फॅशन म्हणून मंगळसूत्र न घालण्याची चूक करू नका !

अनेक महिला पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून विवाह झाल्यानंतरही मंगळसूत्र घालत नाहीत किंवा फॅशन म्हणून मंगळसूत्र गळ्यात घालण्याऐवजी हातात घालतात, तसेच काही ठिकाणी अविवाहित महिलाही मंगळसूत्र घालतात.

श्रीमद्भागवत कथा ही मानवी जीवनाचे कल्याण करणारी अमर कथा आहे ! – ह.भ.प. प्रकाशानंद गिरीजी महाराज

श्रीमद्भागवत कथा सामान्य कथा नाही, तर अमर कथा आहे. श्रीमद्भागवत पुराण विधीने श्रवण, मनन आणि अनुष्ठान केल्याने जिवाला ७ दिवसांत मुक्ती प्रदान करतो. क‌था, तर्पण, अर्पण आणि समर्पण या ३ गोष्टी शिकवते.

अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

२२.४.२०२३ या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.

सतना (मध्यप्रदेश) येथील मैहर शारदादेवी मंदिरातील मुसलमान कर्मचार्‍यांना हटवण्याचा आदेश

हिंदूंच्या मंदिरात अन्य धर्मियांचे काय काम ? हिंदूंच्या मंदिरात हिंदू कर्मचारी नियुक्त का केले जात नाहीत ?

जम्मू-काश्मीरमधील हिंदूंना अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्यास आमचा आक्षेप नाही ! – राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग

जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी हिंदूंना केंद्रशासन जर अल्पसंख्यांकांचा दर्जा देत असेल, तर राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाला त्यावर कोणताही आक्षेप नाही, असे मत या आयोगाच्या सदस्या सईद शहजादी यांनी व्यक्त केले आहे.