मनी तुमच्या ठेवा हा भाव ।

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘एका साधकाला त्याच्या चुका सांगितल्यावर त्याच्या मनात काही क्षण विकल्प निर्माण झाले. तेव्हा त्याला समजावतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सौ. स्‍वाती शिंदे

श्री गुरु कधी न करती दुजाभाव ।
मनी तुमच्या ठेवा हा भाव ।। १ ।।

पैलतिरी लावणारच आहेत ते आपली नाव ।
मनी तुमच्या ठेवा हा भाव ।। २ ।।

श्री गुरुचरणांचा मन नित्य घेऊ दे ठाव ।
मनी तुमच्या ठेवा हा भाव ।। ३ ।।

तळमळ वाढवता प्रयत्ने  ।
धाव घेई पहा भगवंत वेगे  ।। ४ ।।

श्री गुरु कधी न करती दुजाभाव ।
मनी तुमच्या ठेवा हा भाव’ ।। ५ ।।

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१.२०२३)