साधक आणि भक्त यांच्यासाठी प्रासादिक ठेवा असलेली प.पू. भक्तराज महाराज यांची चैतन्यमय भजने अन् त्यांचे भावार्थ !

चला जाऊ नाथ सदनाला । साई सदनाला ।
सर्व सौख्याचा लाभ होईल आपणाला ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांकडे पाहून ‘काही वैशिष्ट्यपूर्ण जाणवते का ?’, याचा अभ्यास करा !  

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वर्ष २००८ ते २०२१ या काळातील ६ छायाचित्रे पुढे दिली आहेत. या छायाचित्रांतील त्यांचा चेहरा आणि मान यांची त्वचा, डोळे, चेहर्‍यावरील भाव इत्यादी १ ते २ मिनिटे पहा. यांतून ‘काही वैशिष्ट्यपूर्ण जाणवते का ?’, याचा अभ्यास करा.

गुरूंचे माहात्म्य अन् शिष्याची गुरुभक्ती

प्रस्तुत ग्रंथमालिकेत गुरु आणि त्यांची शिकवण यांचे नाना पैलू वर्णन केले आहेत. त्यामुळे शिष्याला गुरूंच्या अंतरंगाचे खरे दर्शन घडेल. यामुळे शिष्याची गुरूंविषयीची भक्ती दृढ होईल, ‘चांगला शिष्य होण्यासाठी काय करावे’, हे त्याला कळेल आणि त्याला गुरूंचा अधिकाधिक लाभ करून घेता येईल.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनपंक्तींतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे घडलेले जीवनदर्शन !

अथांग संसारसागरात भरकटलेल्या जिज्ञासूंच्या जीवननौकेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गामुळे योग्य मार्ग मिळणे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची छायाचित्रांतून दिसणारी असामान्य आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यांमागील शास्त्र !

या छायाचित्रांकडे केवळ समोरूनच नव्हे, तर कुठल्याही दिशेने पाहिले असता ‘परात्पर गुरु डॉक्टर आपल्याकडेच पहात आहेत’, असे वाटते, तसेच ‘त्यांचे डोके आणि खांदेही आपल्या दिशेने वळत आहेत’, असे जाणवते.

गुरुपौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या ‘विशेष भक्तीसत्संगा’च्या वेळी साधकांना आलेली गुरुतत्त्वाच्या अवतरणाची प्रचीती !

१३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. ७ जुलै २०२२ या दिवशी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा जन्मोत्सव असतो. या निमित्ताने ७.७.२०२२ या दिवशी झालेल्या विशेष भक्तीसत्संगात आलेल्या दैवी अनुभूतींच्या माध्यमातून साधकांना प्रत्यक्ष गुरुतत्त्वाच्या अस्तित्वाची प्रचीती आली.

गुरुतत्त्व आणि राष्ट्रहित !

कठोर प्रयत्न करून गुरुकृपा संपादन केलेल्यांविषयीची शेकडो उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. हे लक्षात घेऊन शिष्योत्तम म्हणजेच स्वतः सक्षम भक्त बनून राष्ट्रासाठी समर्पित होता यावे, यासाठी आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी गुरुचरणी प्रार्थना करून त्यांच्या कृपेस पात्र होऊया !

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सोलापूर येथील ‘बी.आर्. न्यूज’ वाहिनीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन !

या कार्यक्रमात ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय ?’, ‘जीवनातील गुरूंचे महत्त्व’, ‘गुरुपरंपरेमुळे समाजाला झालेला लाभ’ यांविषयी माहिती देण्यात आली आहे. सोलापूरवासियांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा कृपाशीर्वाद आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे शब्दातीत ज्ञान नेहमीच्या तुलनेत सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुसेवा अन् धनाचा त्याग करणाऱ्याला गुरुतत्त्वाचा लाभ सहस्रपटीने होतो.

वर्ष २०२० मधील ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाचे निमंत्रण देण्याची सेवा करतांना वाराणसी येथील धर्मप्रेमी श्री. कुलदीप पटेल यांना आलेल्या अनुभूती

मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी माझे महाविद्यालयीन आणि वसतीगृहातील मित्र यांना गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याचे निमंत्रण दिले.