चीनमध्ये कोरोनाबाधितांना रस्त्यावर खांबांना दोरी बांधून दिले जात आहे सलाईन !

चीनमध्ये मृतदेह कंटेनरमध्ये गोळा केले जात आहेत. बीजिंगमधील सर्वांत मोठ्या स्मशानभूमीत २४ घंटे अंत्यसंस्कार केले जात आहेत. लोक स्मशानभूमीबाहेर लांबच लांब रांगा लावून वाहनांमध्ये मृतदेह घेऊन उभे आहेत.

चीनमध्ये प्रतिदिन आढळतात कोरोनाचे १० लाख रुग्ण !

चीनमध्ये प्रतिदिन १० लाख कोरोनाचे रुग्ण आढळत असून  प्रतिदिन स्रहस्रो लोकांचा मृत्यू होत आहे. हा आकडा याहीपेक्षा पुष्कळ अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

जगासाठी मोठी डोकेदुखी : चीनमधील अण्वस्त्रांची वाढती संख्या !

भारताकडे चीनला प्रत्युत्तर देण्याची क्षमता असली, तरी चीनकडे असलेल्या शस्त्रांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे केवळ भारतालाच नाही, तर सर्व जगालाच याचा धोका आहे.

चीनमध्ये कोरोनामुळे हाहा:कार उडाला असतांना सर्व काही आलबेल असल्याचे सरकारी वृत्तांकन !

स्वतःच्या अंतर्गत समस्येविषयी जगाला खोटी माहिती देणारा चीन विश्‍वास ठेवण्यास पात्र नाही. भारताने त्याच्यापासून सदैव सावध रहावे !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय वैद्यकीय संघटनेकडून नारिकांना सावधगिरी बाळगण्याची सूचना !

चीनमध्ये वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणावरून भारतातही सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

देशात पुन्हा मास्क बंधनकारक होण्याची शक्यता ! – केंद्र सरकार

चीनमध्ये कोरोनाच्या झालेल्या उद्रेकाचा परिणाम !

चीनमध्ये शून्य कोविड धोरणात सवलत दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाची लागण !

अमेरिकी शास्त्रज्ञ आणि महामारी तज्ञ एरिक फेगल-डिंग यांनी चेतावणी दिली आहे की, पुढील ९० दिवसांत चीनच्या ६० टक्के लोकसंख्येला आणि जगातील १० टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होईल.

भारत आणि चीन यांच्या सैनिकांची झटापट : भारताने चीनला दिलेले सडेतोड उत्तर !

भारताच्या तवांग भागात चिनी सैन्याने ९ डिसेंबर या दिवशी उल्लंघन केले. त्यात त्यांची भारतीय सैन्याशी झटापट झाली. यात दोन्ही बाजूचे सैनिक घायाळ झाले. ही घटना का घडली ? याविषयी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉ. शैलेद्र देवळाणकर यांचा सविस्तर माहिती देणारा लेख येथे देत आहोत.

वर्षभरात १० पैकी ६ भारतियांकडून चिनी उत्पादनांवर बहिष्कार ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

चिनी भ्रमणभाष आणि तत्सम उत्पादने यांना योग्य पर्याय नसल्याने भारतीय अद्यापही ही उत्पादने विकत घेत आहेत, हे लक्षात येते ! भारतात या गोष्टी उत्पादित होण्यासाठी भारत सरकारने उद्योजकांना प्रोत्साहित करणे आवश्यक !

अण्वस्त्रांच्या वापराविषयी पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी व्यक्त केलेल्या चिंतेचा रशियावर परिणाम !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अणूबाँबच्या वापराच्या संदर्भात व्यक्त केलेल्या चिंतेचा परिणाम रशियावर झाला आहे, असा दावा अमेरिकेची गुप्तचर संस्था सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी केला.