३ सहस्र ५०० हून अधिक भारतीय आस्थापनांमध्ये चिनी संचालक !

केंद्रशासनाने संसदेत माहिती देतांना ‘देशात अनुमाने २०० चिनी आस्थापने ‘विदेशी आस्थापने’ म्हणून नोंदणीकृत आहेत. यासह देशातील ३ सहस्र ५०० हून अधिक भारतीय आस्थापनांमध्ये चिनी संचालक आहेत’, असे सांगितले.

भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना हुसकावले !  

चीन अशा कुरापती काढतच रहाणार आहे. त्याला योग्य धडा शिकवल्यावरच त्याच्या अशा कुरापती बंद होतील. त्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये संघर्ष : ३० सैनिक घायाळ

या संघर्षात चीनचे सैनिकही घायाळ झाल्याचे वृत्त आहे; मात्र या वृत्ताला केंद्रशासनाने अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.

काबुलमध्ये चिनी नागरिकांचा वावर असणार्‍या हॉटेलवर आक्रमण

काबुल येथील ‘स्टार-ए-नौ’ या हॉटेलवर अज्ञातांनी आक्रमण केले. येथे प्रथम गोळीबार करण्यात आला आणि नंतर स्फोट घडवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या हॉटेलला ‘चायनीज हॉटेल’ असेही म्हटले जाते.

आर्थिक मंदीमुळे श्रीलंकेची स्थिती अधिक बिकट

चीनच्या दबावाखाली आल्यामुळे आर्थिक मंदीला सामोरे जावे लागलेल्या श्रीलंकेची स्थिती अधिक बिकट झाली आहे.

युद्धसरावाशी तुमचा काही संबंध नाही !  – अमेरिकेने चीनला सुनावले !

उत्तराखंडमधील औली येथील सीमेजवळ भारत आणि अमेरिका यांच्या सैन्यामध्ये युद्धसराव चालू आहे. यावर चीनने आक्षेप घेतला आहे. त्यावर भारत आणि अमेरिका यांनी चीनला सुनावलेे आहे.

चीनच्या सैन्याने भारताच्या सीमेवर बांधली नवीन चौकी ! – अमेरिकेचे खासदार राजा कृष्णमूर्ती

‘चीन भारताच्या सीमेवर काय करत आहे ?’, हे अमेरिकेच्या खासदाराकडून भारताला समजते, हे लज्जास्पद ! भारत सरकारनेच स्वतःहून भारतियांना याची माहिती देणे आवश्यक आहे !

आमच्या भारताशी असलेल्या संबंधांमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करू नये ! – चीनची तंबी

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असणार्‍या ‘पेंटगॉन’ने संसदेला पाठवेल्या अहवालामध्ये चीनविषयी माहिती दिली आहे.

चीनमध्ये ‘कोरा कागद’ बनले सरकारविरोधी आंदोलनाचे शस्त्र !

‘कोरा कागद’ हे चीनमधील अनेक शहरांमध्ये चालू असणार्‍या निदर्शनांचे मुख्य शस्त्र बनले आहे. सहस्रो लोक हातात कोरा कागद घेऊन निदर्शने करत आहेत.