मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र !

मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या विरोधात त्यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे, तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे स्वत: आणि कुटुंबीय यांसाठी संरक्षण देण्याची मागणी केली आहे. 

‘जादूटोणाविरोधी कायद्याची’ प्रभावी कार्यवाही करावी ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यवाही समितीने कामकाजाला गती देऊन राज्यात ‘जादूटोणाविरोधी कायद्याची’ प्रभावी कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

१३ डिसेंबरपर्यंत कामावर येणार्‍या एस्.टी. कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घेणार ! – अनिल परब, परिवहनमंत्री

अनिल परब म्हणाले की, आतापर्यंत १० सहस्र कर्मचार्‍यांचे निलंबन केले आहे. सर्व कर्मचार्‍यांना शेवटची संधी म्हणून १३ डिसेंबरपर्यंत कामावर येण्याची मुदत दिली आहे. १३ डिसेंबरनंतर जे कामावर येणार नाहीत, त्यांना निलंबित करण्यात येईल.

शिरोली पुलाची (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदुत्वनिष्ठांसाठी श्री. मनोज खाडये यांचे ‘हलाल : एक समांतर अर्थव्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन

हिंदुत्वनिष्ठांनी केला, ‘हलाल’ या विषयाची जनजागृती करण्यासाठी हस्तपत्रकांचे वितरण, बैठकांचे आयोजन, तसेच विविध माध्यमांद्वारे हिंदूंमध्ये जनजागृती करण्याचा निर्धार !

२० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कण्हेरचे पाणी आले शाहूपुरीमध्ये !

२० वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कण्हेर पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पाणी उपसा पंपाची कळ दाबून करण्यात आले. त्यामुळे आता कण्हेर धरणातील पाणी शाहूपुरीवासियांना मिळणार आहे.

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील पाद्र्याच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट !

हिंदु संतांच्या विरोधात दिवसरात्र गरळओक करणारे पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, साम्यवादी, तसेच हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे अशा वासनांध आणि व्यभिचारी पाद्र्यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

खटला लढण्यासाठी मुकुल रोहतगी, कपिल सिब्बल आदी नामांकित अधिवक्त्यांची नियुक्ती करणार ! – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील इतर मागासवर्गीय समाजासाठी राखीव जागांचे न्यायप्रविष्ट प्रकरण

एस्.टी.च्या संपामुळे पुणे विभागाची २७ कोटी रुपयांची आर्थिक हानी !

एस्.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी एस्.टी. कर्मचार्‍यांनी ८ नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. पुणे शहरात नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदी निमित्ताने प्रतिदिन ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक आहे

कराड येथे खड्ड्यात पडून लहान मुलाचा मृत्यू झाल्याने ठेकेदार आणि २ सहठेकेदार यांना अटक !

शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरील नगरपालिकेच्या शाळेजवळ संरक्षक भिंतीसाठी काढलेल्या खड्ड्यात पडून विजय विराट चव्हाण (वय ४ वर्षे) याचा मृत्यू झाला.

आज संरक्षणदलप्रमुख बिपिन रावत आणि अधिकारी यांना सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात श्रद्धांजली वहाणार !

११ डिसेंबर या दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ पर्यंत जाहीर श्रद्धांजली वहाण्यात येणार आहे. विलिंग्डन महाविद्यालय आणि भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.