प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारावे !

‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

सांगलीच्या सुप्रसिद्ध श्री गणेश दुर्गाच्या महाद्वाराची दुरवस्था !

‘‘या परिसरात खोक्यांना तेथून हटवणे आवश्यक आहे. महाद्वार हा सांगलीचा ऐतिहासिक ठेवा असून या परिसराची स्वच्छता आणि डागडुजी करण्यासाठी महापालिका प्रशासन अन् श्री गणपति संस्थानने लक्ष देण्याची नितांत आवश्यक आहे.’’

सातारा येथे १२ डिसेंबर या दिवशी साजरा होणारा ‘नौदलदिन’!

वर्ष १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने अतुलनीय पराक्रम करत पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. त्याचे स्मरण म्हणून सातारा येथे १२ डिसेंबर या दिवशी ‘नौदलदिन’ साजरा करण्यात येणार आहे.

कांदा-बटाटा मालाच्या गोणीचे वजन ५० किलोच रहाणार ! – बाळासाहेब पाटील, पणन आणि सहकार मंत्री

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारामध्ये कांदा आणि बटाटा या मालांचे वजन ५० किलोच ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे पणन आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एका बैठकीत दिले आहे.

पंचगंगा नदीत शेकडो मासे मृत्यूमुखी : नेमके कारण अस्पष्ट !

पंचगंगा नदीत बंधार्‍याजवळ शेकडो मासे मृत्यूमुखी पडलेले आढळून आले आहेत. प्रत्येक वर्षी काही मासांच्या कालावधीत अशा प्रकारे मासे मृत्यूमुखी पडलेले आढळून येतात.

खासदार संजय राऊत यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दावरून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस ठाण्याबाहेर भाजपकडून धरणे आंदोलन !

संजय राऊत यांनी भाजपच्या नावे वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि भाजपचे अन्य नेते यांनी आक्षेप घेत संजय राऊत यांच्यावर गुन्हा नोंदवावा, यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या बाहेर धरणे आंदोलन केले.

मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपीची सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश !

अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटके ठेवल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या या प्रकरणांतील आरोपी क्रिकेट बुकी नरेश गौर यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्र्रीय अन्वेषण विभागाला ८ डिसेंबर २०२१ या दिवशी दिले आहेत.

सावित्री नदीच्या पुलावरील भीषण दुर्घटनेनंतरही महाराष्ट्रातील पुलांच्या दुरुस्त्यांविषयी प्रशासन थंडच !

अनेक नागरिकांचे जीव जाऊनही जागे न होणारा प्रशासन नावाचा पांढरा हत्ती जनतेच्या पैशांतून का म्हणून पोसायचा ?

इतर मागासवर्गीय समाजाची सर्वंकष माहिती गोळा करण्यासाठी ३०० कोटी रुपयांची आवश्यकता !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रश्न राज्य सरकारसाठी डोकेदुखी !

भाजपचे आमदार आशिष शेलार यांना जामीन संमत, शिवसेना-भाजप यांचे एकमेकांवर प्रत्यारोप !

मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्याविषयी पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.