पुणे येथे प्रवाशांना लुबाडणार्‍या साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह ६ कर्मचार्‍यांचे निलंबन !

असे भ्रष्ट आणि लोभी पोलीस समाजात होणारा भ्रष्टाचार आणि लूट कशी रोखणार ? यासाठी सक्षम, कर्तव्यदक्ष आणि चारित्र्यवान पोलिसांची भरती केली, तरच भारतीय पोलीसयंत्रणा सक्षम होईल !

भाईंदर येथे क्षुल्लक कारणावरून १३ वर्षीय मुलाची आत्महत्या !

१३ वर्षीय मुलाने केस पुष्कळ छोटे कापले गेल्याच्या कारणासाठी इमारतीच्या १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रात्री कुटुंबातील सर्व जण झोपलेले असतांना त्याने स्नानगृहाच्या खिडकीतून उडी मारली.

सरपंच गोपाळे हत्या प्रकरणी ७ जण कह्यात !

स्थानिक वादातून सरपंच गोपाळे यांची हत्या केल्याचा संशय त्यांचे भाऊ रवींद्र यांनी व्यक्त केला होता; मात्र पोलीस अन्वेषणात नेमके कारण समोर आले नाही.

कलियुगात ‘नामस्मरण’ ही सर्वश्रेष्ठ साधना आहे ! – सौ. राजश्री देशमुख, हिंदु जनजागृती समिती

जीवनातील ८० टक्के समस्यांचे मूळ कारण हे आध्यात्मिक असते. त्यामुळे समस्या दूर करण्यासाठी आध्यात्मिक उपाय म्हणजे ‘साधना’च आवश्यक असते. सध्या कलियुगात ‘नामस्मरण’ ही सर्वश्रेष्ठ साधना आहे.

हनुमान जयंतीनिमित्त पुणे येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यामध्ये फलक प्रसिद्धी, सामूहिक नामजप आणि मारुति स्तोत्र पठण, प्रवचन तसेच ठिकठिकाणच्या मारुति मंदिरात ग्रंथ, सात्त्विक उत्पादनांचे कक्ष, फ्लेक्स प्रदर्शन लावणे, असे विविध उपक्रम राबवण्यात आले.

‘सिंहगड एक्सप्रेस’मध्ये महिलांची छेड काढणार्‍या मदरशा शिक्षकाला अटक

मदरशांमध्ये असे वासनांध शिक्षक शिकवत असल्यामुळेच तेथे विद्यार्थिनींवर बलात्कार, विद्यार्थ्यांचे अनैसर्गिक लैंगिक शोषण झाल्याच्याही अनेक घटना घडलेल्या आहेत. अशा शिक्षकांना कठोर शिक्षाच हवी !

पुणे येथील संगमवाडी नदीपात्रात सापडलेले शिवपिंड २५० वर्षांपूर्वीचे ! – इतिहास अभ्यासक समीर निकम

काळाच्या ओघात गडप झालेल्या वास्तू किंवा साहित्य यांच्या विषयीचा सत्य इतिहास समोर आणण्याचे कार्य पुरातत्व विभागाने करणे अपेक्षित आहे; मात्र भारतातील पुरातत्व विभाग त्या दृष्टीने काहीच करतांना दिसत नाही, हे चिंताजनक आणि दुर्दैवी आहे !

छत्रपती संभाजीनगर येथील ‘मास कॉपी’प्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा भोंगळ कारभार !

सकल जैन समाजाकडून आयोजित रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद !

महावीर जयंतीच्या निमित्ताने शहरात जैन समाजबांधवांकडून भव्य शोभायात्रा काढण्यात आली, तर सांस्कृतिक कार्यक्रमासह अन्नदान, भव्य रक्तदान शिबिर, तसेच व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

अंबरनाथ येथील ग्रंथाभिसरण मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम

‘ज्ञानदीप’ संस्थेकडून ग्रंथालयास विविध उपक्रमांची आकस्मित भेट !