लातूर एस्.टी. विभागात २१ नवीन बसगाड्यांचे उद्घाटन !

एस्.टी. विभागात २१ नवीन बसगाड्यांचे उद्घाटन उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते करण्यात आले. अंबाजोगाई रस्त्यावरील बसस्थानक क्रमांक २ वर या नवीन बसगाड्यांचे स्वागत करण्यात आले.

मालखेड (अमरावती) येथे मालगाडीचे २० डबे घसरले !

या अपघातामुळे ५६ गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १२ रेल्‍वेगाड्या रहित करण्‍यात आल्‍या आहेत, तर इतर गाड्यांचा मार्ग वळवण्‍यात आला आहे. सध्या रेल्वेकडून बचावकार्य चालू आहे. रेल्वे मार्ग अद्याप पूर्ववत् झालेला नाही.

(म्हणे) ‘ग्रहण अशुभ नसते, यामुळे गरोदर महिलांना ग्रहण पाळायची सक्ती करू नका !’

हिंदूंचा बुद्धीभेद करून अधर्माचरणाकडे नेऊ पहाणार्‍या अंनिसवर बंदी का घालू नये ? असे जनतेला वाटते !

नागपूर येथे जाब विचारला म्हणून गर्भवती महिलेला रुग्णालयाच्या प्रभागातून हाकलले !

गर्भवतीची वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उघड्यावर प्रसूती !

हिंदु देवस्थानाच्या भूमी घोटाळाप्रकरणी भूखंड माफियांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्याचे संभाजीनगर खंडपिठाचे आदेश !

जिल्ह्यात हिंदु देवस्थानाच्या भूमीची अवैध हस्तांतरणाची ८ प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर या प्रकरणाचे अन्वेषण विशेष अन्वेषण पथकाकडे सोपवण्यात आले होते; मात्र पथकाने अहवाल दिल्यानंतरही फौजदारी कारवाई न झाल्याने राम खाडे यांनी संभाजीनगर खंडपिठात धाव घेतली.

कळंबोली (नवी मुंबई) येथील ‘गौरव क्लासेस’ या शिकवणीवर्गात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शौर्य जागृती व्याख्यान

या वेळी वर्तक सर यांनी ‘स्वतःचे रक्षण कसे करावे’ आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा उद्देश याविषयी सांगितले. हिंदु जनजागृती समितीच्या विविध उपक्रमांत सहभागी होऊन वर्तक सर विद्यार्थ्यांनाही नेहमी त्यात सहभागी करून घेत असतात.

पुणे जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायतींचा ‘वित्त आयोगा’च्या निधीचा शून्य व्यय !

देशातील ग्रामपंचायतींना केंद्र सरकारच्या वतीने आपापल्या गावांच्या विकासासाठी वित्त आयोगाचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो.

पिंपरी-चिंचवड (पुणे) पोलिसांच्या वाहनांसाठी २ कोटींचा निधी !

शहर पोलीस दलासाठी आणखी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने राज्यातील पोलीस भरतीत २०० जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भरण्यात येतील.

अमरावती येथील आमदार रवी राणा यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद !

आमदार रवी राणा यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी, तसेच त्यापूर्वी आणि नंतरही विविध ठिकाणी आपल्याविषयी खोटी, अपर्कीतीकारक, बनावट आणि चारित्र्यहनन करणारी जाहीर वक्तव्ये केल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

निधर्मी पक्षांच्या प्रचाराचा सामना करण्यासाठी भाजपद्वारे ३ लाख मुसलमान कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार !

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची सिद्धता करण्यास आतापासूनच प्रारंभ केला आहे. निधर्मी पक्षांच्या प्रचाराचा सामना करण्यासाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे.