‘आषाढ शुक्ल चतुर्दशी (२८.७.२०२६) या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना पू. राजाराम भाऊ नरुटे यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.
पू. राजाराम भाऊ नरुटे यांच्या ९४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. सत्ययुगात पू. राजाराम भाऊ नरुटे हे ‘सोमकर्ण’ या रूपात असतांना त्यांना सप्तर्षींपैकी ‘मरिची’ ऋषींकडून ‘ॐ नमो नारायण’ या नामजपाची दीक्षा मिळणे आणि त्यांनी श्रीविष्णूची उपासना करणे
‘पू. राजाराम भाऊ नरुटेकाका यांनी सत्ययुगात ‘सोमकर्ण’ या नावाने पृथ्वीवर जन्म घेतला होता. त्यांना सप्तर्षींपैकी ‘मरिची’ ऋषींनी ‘ॐ नमो नारायण ।’ या नामजपाची दीक्षा देऊन त्यांना श्रीविष्णूची भक्तीयोगानुसार उपासना करण्यास सांगितली होती. त्याप्रमाणे त्यांनी त्या जन्मात श्रीविष्णूची उपासना केली. तेव्हा त्यांच्यातील विश्वासाचे रूपांतर श्रद्धेत झाले. या जन्मात जेव्हा त्यांचे ‘सोमकर्ण’ या रूपाचे कार्य संपले, तेव्हा ते उच्च स्वर्गलोकात गेले.
२. त्रेतायुगात पू. राजाराम भाऊ नरुटे हे ‘अश्वकर्ण’ या रूपात असतांना त्यांना प्रभु श्रीरामाचे दर्शन होणे

त्रेतायुगात जेव्हा प्रभु श्रीराम शरभंग ऋषींना दर्शन देण्यासाठी आले, तेव्हा पू. राजाराम भाऊ नरुटेकाका तेथे शरभंग ऋषींचे शिष्य ‘अश्वकर्ण’ या रूपात उपस्थित होते. त्यांना प्रभु श्रीरामाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यामुळे त्यांची भगवंतावरील श्रद्धा अधिकच दृढ झाली. त्यामुळे त्यांच्यातील श्रद्धेचे रूपांतर भावात झाले. या जन्मात जेव्हा त्यांचे ‘अश्वकर्ण’ या रूपाचे कार्य संपले, तेव्हा ते रामलोकात गेले. तेथे ते दूर राहून प्रभु श्रीरामाच्या दिव्य रूपाचे सतत दर्शन घेऊन भावस्थितीत रहात होते.
३. द्वापरयुगात पू. राजाराम भाऊ नरुटे हे ‘श्यामकर्ण’ या रूपात असतांना त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य दर्शनाचा लाभ झाल्यामुळे त्यांना आत्मज्ञान मिळू लागणे
द्वापरयुगात जेव्हा श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेत आला, तेव्हा त्यांना पहाण्यासाठी जनसागर आला होता. त्या वेळी तेथे ‘श्यामकर्ण’ या रूपात पू. राजाराम भाऊ नरुटेकाका उपस्थित होते. त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य दर्शनाचा लाभ झाल्यामुळे त्यांना आत्मज्ञान मिळू लागले आणि त्यांच्यातील भावाचे रूपांतर भक्तीत होऊन त्यांच्यात भगवंताप्रती निस्सीम भक्ती निर्माण झाली. या जन्मात जेव्हा त्यांच्या ‘श्यामकर्ण’ या रूपाचे कार्य संपले, तेव्हा ते गोलोकात गेले. त्यांना तेथे भगवान श्रीकृष्णाचे पार्षद (सेवक) होण्याचे सौभाग्य लाभले. त्यांनी भगवान श्रीकृष्णाचा शृंगार करणे, त्याला नैवेद्य दाखवणे, त्याचे पाय चेपणे इत्यादी विविध प्रकारच्या सगुण सेवा केल्या. त्यामुळे त्यांच्यातील सकाम भक्तीचे रूपांतर निष्काम भक्तीत झाले.
४. पू. राजाराम भाऊ नरुटे हे गोलोकातून पृथ्वीवर जन्माला येणे आणि त्यानंतर ते वैकुंठात जाणार असणे
पू. राजाराम भाऊ नरुटेकाका गोलोकात असतांना त्यांना श्रीविष्णूचे ‘विठ्ठलाच्या’ रूपात दर्शन घेण्याची, तसेच गुरुरूपात मार्गदर्शन प्राप्त करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यांची ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्णाच्या कृपेने ते कलियुगात १६ जुलै १९३२ या दिवशी पृथ्वीवर ‘राजाराम भाऊ नरुटे’ या रूपात जन्माला आले. या जन्मात त्यांच्या मनामध्ये श्री विठ्ठलाप्रतीची निष्काम भक्ती जागृत होऊन त्यांनी अनेक वर्षे ‘आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी’ यांनिमित्त पंढरपूरची वारी केली. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक वर्षे विठ्ठलाचा नामजप भक्तीपूर्ण केला. त्याचे फळ म्हणून त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे श्री विठ्ठलाच्या रूपात दर्शन झाले. त्यामुळे त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे गुरुरूपात लाभले आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांनी वर्ष १४ मार्च २०२२ या दिवशी संतपद प्राप्त केले.
५. पू. राजाराम भाऊ नरुटे यांनी विविध जन्मांत केलेली साधना

टीप – पू. राजाराम भाऊ नरुटेकाका यांच्या कलियुगातील या शेवटच्या मनुष्य जन्माच्या देहत्यागानंतर त्यांना वैकुंठधामाची प्राप्ती होणार आहे. तेव्हा त्यांची आध्यात्मिक पातळी ८५ टक्के असेल. त्यानंतर ते वैकुंठधामी पोचतील. ते तेथे राहून श्रीविष्णूचे सतत दर्शन घेऊन श्रीविष्णूमध्ये विलीन होऊन मोक्षप्राप्ती करतील.
६. पू. राजाराम भाऊ नरुटे यांना चारही प्रकारच्या मुक्ती प्राप्त झाल्याविषयी साक्षात् विठ्ठलाने पू. राजाराम भाऊ नरुटे यांच्या मुखातून सांगणे
पू. राजाराम भाऊ नरुटेकाका यांच्याशी झालेल्या एका भेटीत ते म्हणाले, ‘‘मी संत झाल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटण्यासाठी गेलो, तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘देवाचिया द्वारीं उभा क्षणभरी, तेणें मुक्ति चारी साधिलिया।’’ (संदर्भ : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगातील पंक्ती) तेव्हा ‘ते या ओवी केवळ म्हणत नसून आत्मानुभूती घेत आम्हाला सांगत आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा श्री विठ्ठलाने पू. राजाराम भाऊ नरुटे यांच्या मुखातून बोलून त्यांना चारही प्रकारच्या मुक्ती मिळाल्याची साक्ष दिल्याचे मला जाणवले.
७. पू. राजाराम भाऊ नरुटे यांच्या प्रत्येक युगातील देहत्यागानंतर त्यांना विविध लोकांमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेल्या कमलयानाचे वैशिष्ट्य
पू. राजाराम भाऊ नरुटे यांच्या पहिल्या जन्मात त्यांना पृथ्वीवरून उच्च स्वर्गलोकात घेऊन जाण्यासाठी गुलाबी रंगाचे कमलयान आले होते. तेव्हा त्यांच्या सूक्ष्मदेहातून ‘ॐ नमो नारायणाय ।’ हा नामजप ऐकू येत होता. त्यांच्या दुसर्या जन्मात त्यांना पृथ्वीवरून रामलोकात घेऊन जाण्यासाठी फिकट निळसर रंगाचे कमलयान आले होते. तेव्हा त्यांच्या सूक्ष्मदेहातून ‘जय श्रीराम’ हा नामजप ऐकू येत होता. त्यांच्या तिसर्या जन्मात त्यांना पृथ्वीवरून गोलोकात घेऊन जाण्यासाठी गडद निळसर रंगाचे कमलयान आले होते. तेव्हा त्यांच्या सूक्ष्मदेहातून ‘हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे ।’ हा नामजप ऐकू येत होता. आता त्यांच्या शेवटच्या जन्मात त्यांचा केवळ ‘ॐ’ चा नामजप चालू रहाणार आहे किंवा ते निर्विचार स्थितीत असतील. त्यानंतर त्यांच्या देहत्यागानंतर त्यांना पृथ्वीवरून वैकुंठात नेण्यासाठी सूक्ष्मातून श्रीविष्णु गरुडावर स्वार होऊन येणार आहे. तेव्हा त्यांच्या सूक्ष्मदेहातून कोणताही शब्दजन्य नामजप ऐकू येणार नाही; कारण ते भगवंताच्या नामाशी एकरूप झालेले असतील आणि नामरूपी शांतीची अखंड अनुभूती घेत असतील. अशाप्रकारे त्यांचे भगवंताशी असणारे नामरूपी अनुसंधान संपून केवळ सूक्ष्म अस्तित्वजन्य अनुसंधान चालू रहाणार आहे. यालाच आध्यात्मिक परिभाषेत ‘भक्ताने आधीच नामाचा आधार घेत नंतर परम पवित्र नामरूपी भगवंताशी एकरूप होणे’, असे म्हणतात.
८. पू. राजाराम भाऊ नरुटे यांच्या विविध देहांची शुद्धी झाल्यामुळे त्यांच्याभोवती निर्माण झालेले विविध रंगांचे तेजोवलय

९. पू. राजाराम भाऊ नरुटे यांच्या पहिल्या जन्मापासून शेवटच्या, म्हणजे चौथ्या जन्मापर्यंत झालेल्या मनोदेहाच्या शुद्धीमुळे त्यांच्यामध्ये जागृत झालेले विविध प्रकारचे भाव

टीप – व्यक्तीच्या मनोदेहाची शुद्धी होणे, म्हणजे तिच्या मनावरील विविध संस्कार नष्ट होऊन केवळ भगवंताच्या नामजपाचा संस्कार दृढ होणे. त्यामुळे व्यक्तीच्या मनाला प्रथम भाव, त्यानंतर आनंद आणि शेवटी शांती अनुभवण्यास येते.
१०. पू. राजाराम भाऊ नरुटे यांच्या ठिकाणी श्री विठ्ठलाच्या दिव्य अस्तित्वाची प्रचीती येणे
पू. राजाराम भाऊ नरुटेकाका यांना सायुज्य मुक्ती मिळाल्यामुळे त्यांच्या ठिकाणी साक्षात् विठ्ठलाचे दर्शन होऊन श्री विठ्ठलाच्या दिव्य अस्तित्वाची प्रचीती येते. यावरून पू. राजाराम भाऊ नरुटे यांच्या भक्तीची थोरवी लक्षात येते. ते ८.७.२०२६ या दिवशी जेव्हा मला भेटले, तेव्हा मला वाटले,‘विठ्ठल तो आला आला, मला भेटण्याला ।’ (भगवंत आणि त्याचा भक्त एकरूप झाले आहेत.) (क्रमश:)
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा आणि टंकलेखनाचा दिनांक : २१.७.२०२६, वेळ : सकाळी १० ते १०.४० अन् एकूण कालावधी ४० मिनिटे)
तळमळीने धर्मप्रसार करणारे अलिबाग, रायगड येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गिरीश सदाशिव जोशी (वय ५६ वर्षे) !
उतारवयातही स्वावलंबी, कार्यरत आणि आनंदी असलेले अलिबाग (रायगड) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश महादेव आठवले (वय ९१ वर्षे) !
शांत, समाधानी आणि अखंड नामानुसंधानात असणार्या बडोदा (गुजरात) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शालिनी फाटक (वय ९१ वर्षे) !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
गुरुस्तवन भावांजली : साधकांना गुरुकृपायोगरूपी तारक मंत्र प्रदान करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !